१४३ जणांमध्ये ६० वर्षांवरील मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 05:00 AM2020-09-29T05:00:00+5:302020-09-29T05:00:33+5:30

मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. प्रादूर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीला लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर हळूहळू शिथिलता देण्यात आली. मात्र यानंतर रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वप्रथम २ मे ला पहिल्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर हळुहळू ही संख्या वाढत आहे. २८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ९ हजार ५८२ वर रुग्णसंख्या पोहचली आहे.

The death toll is higher among 143 people over the age of 60 | १४३ जणांमध्ये ६० वर्षांवरील मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक

१४३ जणांमध्ये ६० वर्षांवरील मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक

Next
ठळक मुद्देकोरोनाचे संकट : आठ तरुणांनीही गमावला आपला जीव

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाने आपले पायमुळे घट्ट रोवले आहे. मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. सध्यास्थितीत साडेऊन हजार रुग्णसंख्या पोहचली असून असून १४३ जणांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये सर्वाधिक मृत्यू ६० वर्षावरील नागरिकांचा झाला असून ती संख्या ६६ वर आहे. तर ३० ते ४० वयोगटातील आठ जणांना आपल्या प्राणाला मुकावे लागले.
मार्च महिन्यापासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. प्रादूर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीला लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर हळूहळू शिथिलता देण्यात आली. मात्र यानंतर रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वप्रथम २ मे ला पहिल्या रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर हळुहळू ही संख्या वाढत आहे. २८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात ९ हजार ५८२ वर रुग्णसंख्या पोहचली आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे मध्यंतरीच्या काळात जिल्ह्यातील रुग्णालयातील बेड फुल झाल्यामुळे काहींना त्रास सहन करावा लागला. अनेकांनी नागपूर, सेवाग्रामचीही वाट धरली. मात्र फारसा उपयोग झाला नाही. प्रशासनाने खासगी रुग्णालयाचा पर्याय उपलब्ध करून देत यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यातच सप्टेंबर महिन्यामध्ये तब्बल दोन वेळा जनता कर्फ्यू लावण्यात आला. या महिन्यामध्ये प्रथम चार दिवस जनता कर्फ्यू लावल्यानंतर रुग्णसंख्या तसेच मृत्यूचे प्रमाण  वाढल्याने पुन्हा २५ पासून जनताकर्फ्यूची हाक देण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यातील ६० वर्षावरील ६६ नागरिकांना कोरोनाने आपल्या कवेत घेतले असून हा आकडा इतर वयोगटाच्या मृृत्यूच्या तुलनेत अधिक आहे. यामध्ये ५० ते ६० वर्षातील ४४ जणांना, ४० ते ५० वयोगटातील २५ जणांना तर ३० ते ४० या वयोगटातील सात पुरुष तसेच एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, सर्वात जास्त मृत्यू चंद्रपूर शहरात झाले असून ते ८३ वर पोहचले आहे. तर जिवती, पोंभूर्णा, सिंंदेवाही या तालुक्यात सुदैवाने आजपर्यंत एकही मृत्यूची नोंद नाही.
 

Web Title: The death toll is higher among 143 people over the age of 60

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.