भद्रावती: येथून जवळच असलेल्या पिरली येथील पुलाखाली कोसळून उंटाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. विशेष म्हणजे, या पुलाला कठडे नसल्याने मागील काही दिवसात आठ ते दहा जनावरांही कोसळून मृत्यू झाला.पिरली येथील पुलावरून उंट तथा मेंढ्यांचा कळत जात होता. उंटाच्या पाठीवर ओझे असल्याने आणि समोरून आलेल्या वाहनामुळे उंटाचा तोल गेला आणि त पुलाच्या खाली कोसळला. या घटनेची माहितीच मिळताच इको-प्रोचे तालुका अध्यक्ष संदीप जिवने, संतोष रामटेके, अजय लिहितकर, किशोर खंडाळकर, महादेव कोल्हे यांनी घटनास्थळी जावून त्याचा वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र उंटाचा मृत्यू झाला. यापूर्वी याच पुलावरून अनेक जनावरांचा पळून मृत्यू झाला. तर दोन ते तीन ग्रामस्थही पडून जखमी झाले होते. मात्र संबंधित विभागने पुलाला कठडे लावण्याकडे दुर्लक्ष केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
पुलाखाली पडून उंटाचा मृत्यू
By admin | Updated: February 28, 2015 01:17 IST