शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात काँग्रेस नेत्यावर प्राणघातक हल्ला; हल्लेखोर पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 13:23 IST

शनिवारी चंद्रपुरात काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या पूर्वसंध्येला नंदू नागरकर यांच्यावर झालेला हल्ला राजकीय स्वरूपाचा तर नसेल ना अशी चर्चा चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

ठळक मुद्देबॅट आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण

चंद्रपूर : चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व मनपा नगरसेवक नंदू नागरकर हे शुक्रवारी सकाळी ९ वाजता आझाद गार्डन परिसरात फिरायला गेले असता त्यांच्यावर अज्ञात दुचाकीस्वारांनी प्राणघातक हल्ला चढविला. त्यांना बॅट आणि हॉकी स्टिकने जबर मारहाण करण्यात आली.

या घटनेत नंदू नागरकर हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर चंद्रपूर येथील वैद्यकीय शासकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या पायाला टाके मारावे लागले असल्याची माहिती त्यांचे चिरंजीव बंटी नागरकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. 

नंदू नागरकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या युवकांच्या चेहऱ्यावर रुमाल बांधलेला असल्यामुळे त्यांची ओळख मात्र पटली नाही. शनिवारी चंद्रपुरात काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या पूर्वसंध्येला नंदू नागरकर यांच्यावर झालेला हल्ला राजकीय स्वरूपाचा तर नसेल ना अशी चर्चा चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

नगरकर हे चंद्रपूर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते सोबतच महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून पक्षाची भूमिका वठवत आले आहे.नेहमीप्रमाणे ते आज सकाळी फिरायला गेले होते. आपल्या नेहमीच्या मित्रांसोबत चहा घेतल्यानंतर ते घराकडे परत जातांना काही अज्ञात तरुणांनी दुचाकीने त्यांची वाट अडवली. त्यांच्यासोबत हुज्जत घातली. अशातच दोन तरुणांनी मागाहून हॉकी स्टिक आणि बॅट घेऊन त्यांच्यावर हल्ला चढविला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीcongressकाँग्रेस