शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यू-डायस प्रमोशनसाठी दिलेली मुदत संपली, २८ मुख्याध्यापकांवर कारवाई निश्चित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:43 IST

Chandrapur : २८ शाळांच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात!

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : यू-डायस प्लस प्रणालीत वर्गोन्नोती (प्रमोशन) करण्यात तालुक्यातील २८ शाळांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. वास्तवदर्शी खुलासा केला नाही तर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही संबंधित अधिकाऱ्यांनी दिला आहे.

जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांच्या पत्रानुसार, यू-डायस २०२५-२६ प्रणालीमध्ये विद्यार्थी वर्गोन्नोती सुरू करण्यात आली. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांची नोंदणी करणे या प्रणालीत बंधनकारक आहे. २०२५-२६ मधील ऑनलाइन यू-डायस प्रणालीमध्ये नोंद असलेल्या विद्यार्थ्यांचे नियमानुसार पुढील वर्गात वर्ग नक्की करणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांनी विद्यार्थी वर्गोन्नतीचे काम १६ जून २०२५ पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. मात्र, २८ शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली. कार्यवाहीचा अहवाल सादर करताना संबंधित मुख्याध्यापकांना २० जून २०२५ नंतर ही कामे करता येणार नाहीत, असेही कळविले होते. 

वर्गोन्नोतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळाआकाश प्राथमिक शाळा गोंडपिपरी, आक्सापूर हायस्कूल आक्सापूर, अनुदानित प्राथमिक माध्यमिक शाळा कुडेसावली, भारतीय माध्यमिक आश्रम शाळा तोहोगाव, इंदिरा गांधी हायस्कूल चेक दरूर, किसन विद्यालय वेळगाव, नवजीवन विद्यालय गोजोली, नवज्योती कॉन्व्हेंट आक्सापूर, दुर्गावती निवासी मूकबधिर विद्यालय गोंडपिपरी, श्रीराम आदिवासी प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा गोजोली, सुभद्राबाई सांगडा पाटील आश्रम शाळा गोंडपिपरी, स्वामी विवेकानंद आश्रम शाळा किरमिरी, जि.प. हायस्कूल बोरगाव, जि.प. हायस्कूल चेक नांदगाव, जि.प. हायस्कूल चेक सोमनपल्ली तसेच चेक गोजोली, चेक पेल्लूर, चिवांडा, धाबा, जोगापूर, किरमेरी, सोमनपल्ली, सुखवासी, वटराणा, विहीरगाव, चेक दरूर, गोजोली मक्ता येथील जिल्हा परिषद शाळा अशा एकूण २८ शाळांच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरEducationशिक्षण