शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

हंगामपूर्व कपाशी लागवड धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:13 IST

जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या कपाशीची हंगामपूर्व लागवड केल्यास गुलाबी बोंअडळीचा धोका कायम राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळावी. शिफारस केलेल्या कमी कालावधीच्या पक्व होणाºया बीटी कापूस अथवा सरळ वाणांची जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करण्याचे आवाहन, कृषी विभागाने केले आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना आवाहन : बोंडअळीचा धोका टाळण्यासाठी एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: जिल्ह्याचे प्रमुख पीक असलेल्या कपाशीची हंगामपूर्व लागवड केल्यास गुलाबी बोंअडळीचा धोका कायम राहू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची हंगामपूर्व लागवड टाळावी. शिफारस केलेल्या कमी कालावधीच्या पक्व होणाºया बीटी कापूस अथवा सरळ वाणांची जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतर पेरणी करण्याचे आवाहन, कृषी विभागाने केले आहे.सलग दोन वर्षांपासून कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व्यवस्थापनाबाबतच व्यापक मोहीम राबविण्यात आली. गतवर्षी कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, केंद्रीय कापूस सनशोधन संस्था, कृषी विज्ञान केंद्रासह इतर कृषी क्षेत्रातील यंत्रणांच्या सहकार्याने २०१८-१९ मध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत झाली. येत्या खरीप हंगामात कापूस पिकांवरील गुलाबी बोंडअळीचा अजीवनक्रम खंडीत करण्याच्या दृष्टीने शेतकºयांनी उपाययोजना तसेच अळीचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. यानुसार शेवटच्या वेचणीनंतर शेतातील पºहाटीचे रोटाव्हेटर सारख्या यंत्राद्वारे लहान- लहान तुकडे करुन शेतात गाडणे किंवा शेताबाहेर कंपोस्ट खड्ड्यात टाकावीत. शेतातील पालापाचोळा जमा करुन संपूर्ण शेत व बांध स्वच्छ करावा. एप्रिल- मे महिन्यात जमिनीची खोल नांगरणी करावी. त्यामुळे किडीचे जमिनीतील कोष वर येतात व तप्त उन्हामुळे ते नष्ट होतील किंवा पक्षी त्यांना टिपून खातील.गुलाबी बोंडअळीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत वाणाची लागवड न करता गावनिहाय एकाच वाणाची व एकाच वेळी लागवड करावी.पीक लागवडीपासून काढीणीपर्यंत दर आठवड्याला पिकांमधील कीड रोगाचे व पिकांच्या अवस्थेचे सुक्ष्म अवलोकन केल्याने किडीच्या प्रादूभार्वाची तीव्रता पाहून आर्थिक नुकसानाची पातळी गाठली असल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वापर करावा. अधिकाधिक किटकनाशके एकत्र मिसळून फवारणी वा अधिक मात्रेत फवारणी घातक ठरु शकते, ती टाळावी, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालकांनी यांनी केले.नॉन बीटी कपाशीची लागवड महत्त्वाचीकिडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्मितीसाठी पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे. त्यामुळे यावर्षी कपाशी घेतलेल्या शेतात पुढील हंगामात कापूस लागवड करु नये. पूर्वी तृणधान्य, कडधान्य, गळीत धान्य लागवड केलेली जमीन कापूस लागवडीसाठी निवडावी, या हंगामात कपाशीच्या सभोवती नॉन बीटी (रेफ्युजी/ आश्रीत पीक) कपाशीची लागवड करावी. कपाशीवरील किडीच्या नैसर्गिक शत्रू कीटकांचे संवर्धनासाठी मका, चवळी, उडीद, मूंग, झेंडू व एरंडी पिकांची एक ओळ लावावी. तरच गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण करणे शक्य होणार आहे.तीन महिने कीटकनाशकांचा वापर टाळावापिकांच्या सुरुवातीच्या वाढीच्या तीन महिन्यांपर्यंत कीटकनाशकांचा वापर टाळावा. जेणेकरुन मित्र किडीचे संरक्षण होईल. या काळात वनस्पतीजन्य कीटकनाशके, जैव कीटकनाशके, मित्र किडीचा वापर करावा. युरियाचा जास्त वापर टाळावा, जास्तीच्या नत्र खताचा वापर न करता मृद परीक्षण करुन त्याच्या आधारावर खतांच्या मात्रेचा अवलंब करावा. पिकांच्या ५४ दिवसांत फेरोमन ट्रॅप्सचा वापर प्रतीहेक्टरी पाच याप्रमाणे करावा व पिकातील बदलाची निरीक्षणाची नोंद घ्यावी.

टॅग्स :cottonकापूस