शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोनापूरच्या ‘त्या’ जीर्ण पुलामुळे अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2022 05:00 IST

पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन मोजणीही केली. कामाला मंजुरी मिळेल असे आश्वासन गावकरी वर्गाला दिले होते. मात्र दोन वर्षांपासून याबाबत कुठलाच निर्णय झाला नाही.  १० मार्चपर्यत नवीन पूल मंजूर न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.

संजय अगडेलोकमत न्यूज नेटवर्कतळोधी बा : नागभीड तालुक्यात येत असलेल्या सोनापूर गावालगत असलेल्या घोडाझरी नहरावरील कुलाबा गेट व पूल पूर्णपणे जीर्ण झाला आहे. यामुळे एखाद्या वेळी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्याच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप सोनापूरचे उपसरपंच महेश फटिंग व गावकरी वर्गाच्या वतीने पत्रकार परिषदेत केला आहे.ब्रिटिशकालीन घोडाझरीचा मुख्य  कालव्यावरील कुलाबा गेट हा जीर्ण झाला असल्यामुळे खचून गेलेला आहे. गावाच्या मधोमध ब्रिटिश सरकारने सोनापूर येथील शेतकऱ्यांना पाण्याची अडचण लक्षात ठेवून गेटवर पाणी चढवण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. या मध्यभागावरून गावातील नागरिक नेहमी ये-जा करीत आहे. या पुलावरून जीव मुठीत ठेवून मार्गाक्रमण करावे लागते आहे. या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष येऊन मोजणीही केली. कामाला मंजुरी मिळेल असे आश्वासन गावकरी वर्गाला दिले होते. मात्र दोन वर्षांपासून याबाबत कुठलाच निर्णय झाला नाही.  १० मार्चपर्यत नवीन पूल मंजूर न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा गावकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी सरपंच शीला श्रावण ठोंबरे, उपसरपंच महेश धर्मराव फटिंग, सदस्य सविता कुंभरे, सिंधू सेलोकर, ज्योत्स्ना दडमल, अमोल पत्रू श्रीरामे, भुरू हजारे उपस्थित होते.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पGhodazari Damघोडाझरी धरण