शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोळसा खाणीत बांध फुटला; चार वेकोलि कामगार थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:18 IST

Chandrapur : वेळीच बचाव कार्यामुळे मोठा अनर्थ टळला, सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : तालुक्यातील दूर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भटाळी खुल्या खाणीत कोळसा खनन सुरू असताना चिखल व पाण्याचा बांध अचानक फुटल्याने चार कामगार चिखलाखाली दबल्या गेले. मात्र खाण व्यवस्थापनाने तत्काळ बचावकार्य राबवून सर्व चारही कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना गुरुवारी (दि. १२ मार्च) पहाटे सुमारे १.३० वाजताच्या सुमारास घडली.

या घटनेत आदित्य थेरे (अंडर मॅनेजर), अशोक गिरडे (फोरमन), मेकल मोगली कनकय्या (पी.सी. मशीन ऑपरेटर) आणि डिवरे (ओव्हरमन) हे चार कामगार चिखलाखाली दबले होते. त्यांना तातडीने बाहेर काढून चंद्रपूर येथील डॉ. कुबेर यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. चौघांची प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉ. प्रसन्ना मद्दीवार यांनी 'लोकमत'ला दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, भटाळी खुल्या कोळसा खाणीत रात्रपाळीत कोळसा काढण्याचे काम सुरू होते. पी.सी. मशीनद्वारे खनन सुरू असताना वर साचलेला चिखल बाजूला करून त्याचा तात्पुरता बांध तयार करण्यात आला होता. याच परिसरात संबंधित चारही कामगार आपले कर्तव्य बजावत होते. दरम्यान, अचानक चिखलाचा बांध फुटल्याने चिखल आणि पाण्याचा जोरदार लोट त्यांच्या दिशेने आला. बचावाची संधी न मिळाल्याने चारही कामगार आणि पी.सी. मशीन चिखलाखाली दबली.

घटना घडताच परिसरात काम करणाऱ्या इतर कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला. काही कामगारांनी तत्काळ खाण व्यवस्थापनाला माहिती दिली. त्यानंतर दुसरी पी.सी. मशीन मागवून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले आणि दबलेल्या चारही कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती वेकोलिच्या 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, त्यांनी गुरुवारी दिवसभर घटनास्थळी जाऊन आढावा घेतला. दरम्यान, या घटनेची अधिकृत माहिती दुर्गापूर पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झालेली नसल्याचे समजते.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Coal mine embankment breach: Four WCL workers narrowly escape

Web Summary : Four workers were trapped after an embankment collapsed at Bhatali coal mine. Mine management rescued them promptly. All workers are safe and stable. An investigation is underway.
टॅग्स :Coal Shortageकोळसा संकट