चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी सायकल चालवित सदर रॅलीचे नेतृत्व केले. अंचलेश्वर गेट, गिरनार चैक, गांधी चैक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चैक, वाहतूक कार्यालय मार्गे महावितरणच्या ऊर्जानगर उपकेंद्रात सांगता झाली.
रॅलीत महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सायकल चालवित सहभाग नोंदविला. सदर रॅलीत चंद्रपूर मंडळाच्या अधीक्षक अभियंत्या संध्या चिवंडे, अधीक्षक अभियंता(पायाभूत आराखडा) सुहास म्हेत्रे, सहा.महाव्यवस्थापक (चंद्रपूर परिमंडळ) सुशील विखार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी योगेश गोरे, कार्यकारी अभियंता(चंद्रपूर विभाग) विजय चावरे, कार्यकारी अभियंता (बल्लारशा विभाग) महेश तेलंग, महावितरण कर्मचारी कला व क्रीडा मंडळ चंद्रपूरचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. रॅलीच्या यशस्वीतेसाठी महावितरण कर्मचारी कला व क्रीडा मंडळ चंद्रपूरचे पदाधिकारी अमित बिरमवार, बंडू कुरेकार आदींनी सहकार्य केले.