शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
2
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
3
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
4
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
5
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
6
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
7
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
8
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
9
"मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो, कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
10
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
11
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
12
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
13
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
14
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
15
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
16
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
17
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
18
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
19
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
20
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात

पोलिसांच्या मोबाईलमध्ये आता गुन्हेगारांची कुंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

एखाद्या गुन्ह्यात कोणताही आरोपी पकडल्यास त्यांच्यावर अन्य जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत का, याबाबतची संपूर्ण हिस्ट्री शोधून काढणे अत्यंत कठीण काम होते. त्यासाठी पोलिसांना न्यायालयाच्या संकेतस्थळावर अवलंबून राहावे लागत होते. त्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी यायच्या. मात्र, आता पोलिसांसाठी तयार केलेल्या ‘कोर्ट चेकर’ या अप्लिकेशनमुळे पोलिसांची या कटकटीपासून मुक्ती झाली आहे.

ठळक मुद्देकोर्ट चेकर अ‍ॅप : पोलिसांना कर्तव्य बजावणे झाले सोपे

परिमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुन्हेगारांचा रेकार्ड सांभाळणे पोलिसांच्या डोईजड होत असते. मात्र आता या कटकटीपासून पोलिसांना मुक्ती मिळाली असून सर्व रेकार्ड पोलिसांच्या मोबाईलमध्येच डाऊनलोड करणे शक्य झाले आहे. पोलिसांसाठी नुकतेच ‘कोर्ट चेकर’ नावाचे अप्लिकेशन तयार करण्यात आले. या अ‍ॅपमुळे राज्यातील कोणत्याही गुन्हेगारांची माहिती त्यासोबतच गुन्हेगाराचा न्यायालयात सुरू असलेला खटला आणि तारखांचीही माहिती मिळणार असल्याने पोलिसांची डोकेदुखी कमी झाली आहे.एखाद्या गुन्ह्यात कोणताही आरोपी पकडल्यास त्यांच्यावर अन्य जिल्ह्यातही गुन्हे दाखल आहेत का, याबाबतची संपूर्ण हिस्ट्री शोधून काढणे अत्यंत कठीण काम होते. त्यासाठी पोलिसांना न्यायालयाच्या संकेतस्थळावर अवलंबून राहावे लागत होते. त्यासाठी अनेक तांत्रिक अडचणी यायच्या. मात्र, आता पोलिसांसाठी तयार केलेल्या ‘कोर्ट चेकर’ या अप्लिकेशनमुळे पोलिसांची या कटकटीपासून मुक्ती झाली आहे. ‘टष्ट्वेंटी फोर बाय सेवन’ या साईटवरून पोलिसांना सदर अ‍ॅप डाऊनलोड करता येतो. त्यानंतर युजर आयडी व पासवर्ड टाकल्यानंतर मोबाईल किंवा संगणकामध्ये वापर करणे सहज शक्य होते.केवळ पोलिसांनाच करता येणार अ‍ॅपचा वापरसदर अप्लिकेशन तयार करण्यासाठी राज्याच्या पोलीस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे. सदर अप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर त्याची खातरजमा केली जाते. सदर व्यक्ती पोलीस विभागात असेल तरच त्याला युजरआईडी मिळतो. विशेष म्हणजे आॅनलाईन व्हेरीफिकेशन झाल्याशिवाय या अ‍ॅपचा वापर करता येत नाही.आयसीजेएस प्रणालीनंतरचा दुसरा प्रयोगदेशातील कोणत्याही आरोपीची संपूर्ण पार्श्वभूमी पोलिसांना त्वरीत मिळावी, यासाठी यापूर्वी सीसीटीएनएस आॅनलाईन प्रणालीतर्फे आयसीजेएस यंत्रणा सुरू झाली आहे. त्यानंतरचा ‘कोट चेकर’ हा दुसरा प्रकार आहे. आयसीजेएस प्रणालीेमध्ये संपूर्ण माहिती अपलोड करण्यात आली. या यंत्रणेद्वारेही पोलिसांना आरोपीची सर्वच माहिती मिळते, अशी माहिती पोलीस विभागाने ‘लोकमत’शी बोलताना दिली.अप्लिकेशनद्वारे छायाचित्रांसह मिळणारी माहितीन्यायालयाची तारीख असल्यास पोलिसांना आरोपींना घेऊन न्यायालयात जावे लागते. या अप्लिकेशनमुळे पोलिसांना आरोपीची न्यायालयात हजर होण्याची तारीख, आरोपीवरील गुन्हे, सुनावणीची तारीख, न्यायालयाचा आदेश आणि आरोपीच्या छायाचित्रासह अन्य माहिती मिळत असते.गुन्हेगारांची हिस्ट्री जाणून त्यादृष्टीने तपास करण्यासाठी हे अ‍ॅप अत्यंत उपयोगी आहे. गुन्ह्यांचा तपास करून आरोपीला अट करणे आता सहज शक्य झाले. अ‍ॅपचे महत्त्व लक्षात घेऊन जिल्ह्यातील सर्व ठाण्यांमध्ये वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.-डॉ. महेश्वर रेड्डी,पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

टॅग्स :Policeपोलिस