शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

इतिहास संशोधनातून पर्यटन रोजगार निर्माण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 22:39 IST

विदर्भाची भूमी ही ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. ऐतिहासिक वैभव हा देशाचा सांस्कृतिक ठेवा असतो. विदर्भाचा इतिहास हा प्राचीन असून वैभवशाली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याविषयी इतिहासाच्या संशोधकांनी विविध स्थळांकडे पर्यटन विकासाच्या दृष्टीने बघावे आणि रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, यावर वस्तुनिष्ठ संशोधन करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी ५१ व्या इतिहास परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

ठळक मुद्देनामदेव कल्याणकर : गडचांदूर येथे इतिहास परिषदेचे ५१ वे अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचांदूर : विदर्भाची भूमी ही ऐतिहासिक वारशाने समृद्ध आहे. ऐतिहासिक वैभव हा देशाचा सांस्कृतिक ठेवा असतो. विदर्भाचा इतिहास हा प्राचीन असून वैभवशाली आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याविषयी इतिहासाच्या संशोधकांनी विविध स्थळांकडे पर्यटन विकासाच्या दृष्टीने बघावे आणि रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील, यावर वस्तुनिष्ठ संशोधन करावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी ५१ व्या इतिहास परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.गडचांदूर येथील शरद पवार कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व गोंडवाना विद्यापीठाच्या पुढाकारात ही इतिहास परिषद पार पडली. दहशतवादी हल्ल्यातील शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष डॉ. आनंदराव अडबाले तर प्रमुख अतिथी डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, बिजभाषक डॉ. बी. आर. वाघमारे, परिषदेचे अध्यक्ष डॉ. व्ही. जी. बैस, प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, परिषदेचे सचिव प्रा. डॉ. शरद सिंग, प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह, प्रा. डॉॅ. शरद बेलोरकर व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.प्राचार्य सिंह यांनी इतिहास परिषद आयोजनाची भूमिका विशद केली. डॉ. यांनी भारताच्या सांस्कृतिक विकासात इतिहासाचे योगदान कसे आहे, नव्या पिढीने यातून कोणती प्रेरणा घ्यावी, यावर भाष्य केले.डॉ. बी. आर. वाघमारे म्हणाले, १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात आदिवासींचे मोठे योगदान आहे. त्यांचा संघर्ष हा भारताच्या इतिहासामधील अमुल्य ठेवा आहे. विदर्भाचा गतकालीन इतिहास हा आदिवासींच्या क्रांतीचा तेजस्वी वारसा असून ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी आदिवासींच्या योगदानाकडे कदापि दुर्लक्ष करता येत नाही, याकडे लक्ष वेधले. अध्यक्ष डॉ. व्ही. जी. बैस म्हणाले, अहिंसेच्या लढ्याने भारताचा स्वातंत्र्य संग्राम इतिहास जगात अजरामर झाला. महात्मा गांधींचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. यावेळी इतिहास परिषदेच्या ‘ शोध निबंध (खंड १९ )’ हा संशोधक ग्रंथ तसेच डॉ. प्रफुल्ल टाले लिखित ‘महाराष्टÑातील समाज सुधारक’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. ‘इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा’ या गीताने अतिथींचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवर सत्कार करण्यात आला. संचालन प्रा. डॉ. संजय गोरे यांनी केले. परिषदेचे सचिव प्रा. डॉ. शरद बेलोरकर यांनी आभार मानले.