शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

नागभीड-नागपूर नॅरोगेज रेल्वेचे काऊंटडाऊन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 06:00 IST

घनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड : नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणाऱ्या नॅरोगेज रेल्वेगाडीचे काऊंटडाऊन सुरू ...

ठळक मुद्देसंडे अँकर । २५ नोव्हेंबरपासून गाडीची चाके कायमची थांबणार

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नागभीड - नागपूर या रेल्वे मार्गावर चालणाऱ्या नॅरोगेज रेल्वेगाडीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. २५ नोव्हेंबरपासून या गाडीची चाके कायमची थांबणार आहे.भविष्यात या रेल्वेने प्रवासाची संधी मिळणार नाही. म्हणूनच शेवटचा प्रवास म्हणून अनेकांनी नागपूर आणि जवळच्या मांगली, कानपा, भुयार, भिवापूर, उमरेड अशा ठिकाणी प्रवास करणे सुरू केले आहे. १९१३ पासून या मार्गावर ही नॅरोगेज रेल्वे अव्याहत धावत आहे. पण काळाच्या ओघात या रेल्वे गाडीची उपयोगिता कमी होऊ लागली. आणि प्रथमत: १९५२ मध्ये या मार्गाचे ब्राडगेजमध्ये रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी संसदेत करण्यात आली. त्यानंतर १९८२ - ८३ मध्ये या मागणीचा संसदेत पुन्हा पुनरूच्चार झाला. पण पुरेशा पाठपुराव्याअभावी ही मागणी तशीच पडून राहिली. मात्र १९९३ च्या दरम्यान खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या रेटयामुळे गोंदिया - बल्लारशा या नॅरोगेज रेल्वे मार्गास ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली व ते कामही पूर्ण करण्यात आले.दरम्यान २००० च्या दशकात या नॅरोगेज मार्गाने पर्यटन गाडीचा बागुलबुवा उभा करण्यात आल्याने शासकीय तसेच प्रशासकीय स्तरावर ब्रॉडगेजची मागणी मागे पडली. मात्र सामान्य जनतेतून या नॅरोगेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रेल्वे मार्गात रूपांतर करण्यात यावे, ही मागणी नेहमीच करण्यात येत होती. अखेर शासनाने या रेल्वे मार्गास मंजुरी प्रदान केली आहे.एवढेच नाही तर १ डिसेंबरपासून कामास सुरूवातही करण्यात येणार आहे. याअनुषंगाने रेल्वेच्या मंडल प्रबंधक शोभना बंदोपाध्याय यांनी नागपूरवरुन या मार्गाने प्रवास करून अडचणी समजून घेतल्या.दिवसभरात चार टाईमिंगया मार्गाने दिवसभरात चार टाईमिंग होते. यात सकाळी ६.१० , ८.२५ , दुपारी १२ च्या दरम्यान तर संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान असे चार टाईमिंग नागभीडवरून नागपूरला रवाना होत होते. नागपूरचे भाडे २५ रुपये असल्याने सर्वसामान्य प्रवासी या गाडीलाच पसंती देत होते.महाप्रबंधकांचाही 'प्रवास'शुक्रवारी झोन रेल्वे महाप्रबंधक गौतम बॅनर्जी व मंडल रेल्वे प्रबंधक शोभना बंडोपाध्याय यांनी या नॅरोगेज रेल्वे गाडीने प्रवास केला व अडचणी जाणून घेतल्या. यावेळी नागभीड जंक्शन रेल्वे स्टेशनवर त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी वरिष्ठ सहायक मंडल अभियंता ए.टी.पांडे, स्टेशन प्रबंधक मसराम, रेल्वे झोन कमिटीचे सल्लागार सदस्य संजय गजपुरे, नागभीड नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ.उमाजी हिरे यांच्यासह अनेक अधिकारी व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी महाप्रबंधकांनी नागभीड रेल्वे स्टेशन व परिसराची पाहणी केली. त्यानंतर रेल्वे स्टेशनवरील विविध समस्या जाणून घेत त्यांना सोडविण्यासाठी आश्वासन दिले.

टॅग्स :railwayरेल्वे