पावसाअभावी कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही संकटाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 05:00 AM2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:00:53+5:30

कोरोना महामारीने आर्थिक घडी विस्कटली असतानाच शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप हंगामातील पिकांची लागवड केली. अधूनमधून पाऊस येत राहिल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र आता अचानक पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढत चालली आहे. कपाशी जमिनीतून बाहेर उमलण्यासाठी पावसाची आवश्यकता असते. आकाशात दररोज काळे ढग दाटून येतात.

Cotton growers fear crisis due to lack of rains | पावसाअभावी कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही संकटाची भीती

पावसाअभावी कपाशी उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही संकटाची भीती

Next
ठळक मुद्देदमदार पावसाची प्रतीक्षा । दुबार पेरणीचे संकट, रात्रीचा पाऊस दिलासादायक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : मृगाचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने खरीप हंगामातील कपाशीची लागवड केली. मात्र, त्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्यामुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे पावसाअभावी कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच करपण्याचा धोका आहे. यंदाही अस्मानी संकटांनी शेतकरी भरडण्याची चिन्हे आहेत. शनिवारी रात्री आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
कोरोना महामारीने आर्थिक घडी विस्कटली असतानाच शेतकऱ्यांनी कर्ज काढून खरीप हंगामातील पिकांची लागवड केली. अधूनमधून पाऊस येत राहिल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र आता अचानक पाऊस गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढत चालली आहे. कपाशी जमिनीतून बाहेर उमलण्यासाठी पावसाची आवश्यकता असते. आकाशात दररोज काळे ढग दाटून येतात. पुन्हा पाच दिवसात पाऊस आला नाही तर उसनवारी व कर्ज काढून पेरलेले महागडे बियाणे पुन्हा घ्यायला शेतकºयांकडे पैसा उरला नाही. राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, चिंचोली, कढोली, मानोली, बाबापूर चार्ली, निर्ली, धिडशी, माथरा, गोयेगाव, अंतरगाव परिसरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात पाऊस झाल्यानंतर अचानक पावसाने हुलकावणी दिली. सध्या कपाशीचे बीज अंकुरण्याचा काळ असतानाच पाऊस गायब झाला. रात्रीला जिल्ह्याच्या काही भागात दमदार पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या.

कपाशी जमिनीतच करपण्याची भीती
कपाशी वाचविण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. मात्र पाऊस येण्याची कोणतीच चिन्ह दिसत नसल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. आता पाऊस आला नाही तर शेतकऱ्यांचे काही खरे नाही. असा केविलवाणा सुर शेतकरी वर्गात उमटू लागला आहे. पावसाअभावी कपाशी जमिनीतून उमलण्यापूर्वीच करपण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे ‘काळ्या आईच्या कुशीत पेरलेले बीज उमलू दे’ एवढीच इच्छा शेतकरी व्यक्त करीत आहे.

Web Title: Cotton growers fear crisis due to lack of rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.