शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
Top Marathi News Live: ही माझी शेवटची सभा, आता ४ मे नंतर शपथविधी सोहळ्याला येईन: PM मोदी
3
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
4
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
5
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
6
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
7
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
8
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
9
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
10
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
11
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
12
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
13
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
14
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
16
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
17
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
18
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
19
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेच्यातच पहाडावरील कापूस गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 06:00 IST

मागील पाच वर्षात कपाशी उत्पादनाचा इतिहास पाहता व यंदा हिरवेगार कापसाचे चित्र पाहून शेतकऱ्यांनी विविध स्वप्न रंगविली होती. मात्र परतीच्या पावसाने स्वपन्नाचा चुराडा केल्याने यावषीर्ही शेतकरी कर्जाच्या छायेतून बाहेर निघेल की नाही, ही शंका आहे. पूर्वीही दुष्काळाचे चटके बसत गेले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची झोळी रिकामी : आता तुरीवरही अळी आल्याने शेतकरी हैराण

शंकर चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती (चंद्रपूर) : पांढर सोनं असे संबोधले जाणाºया कापसाने यंदा शेतकऱ्यांच्या हाती कवडया दिल्या आहेत. कुठे दोन वेच्यात तर कुठे तीन वेच्यातच कापूस झाडावरून गायब झाला असून आता तुरीवरही अळ्याचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. शासनाने दुष्काळी अनुदान जाहीर केले. मात्र अजूनही दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहचले नसल्याने प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.मागील पाच वर्षात कपाशी उत्पादनाचा इतिहास पाहता व यंदा हिरवेगार कापसाचे चित्र पाहून शेतकऱ्यांनी विविध स्वप्न रंगविली होती. मात्र परतीच्या पावसाने स्वपन्नाचा चुराडा केल्याने यावषीर्ही शेतकरी कर्जाच्या छायेतून बाहेर निघेल की नाही, ही शंका आहे. पूर्वीही दुष्काळाचे चटके बसत गेले. परंतु यंदाचा दुष्काळ शेतकऱ्यांना कमालीचा अडचणीत आणणारा ठरला आहे. शेतीतून आर्थिक घडी मजबूत करणारे कपाशी हेच मुख्य पीक आहे. याच उत्पादनाने दगा दिल्याने आता पहाडावरील शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. बि-बियाणासाठी घेतलेले बँक कर्ज व सावकारी कर्ज फेडायचे कसे व मुला-बाळाचा सांभाळ करायचा कसा, असा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला आहे.मागील वर्षी बोंडअळीने तर यंदा निसर्गाने शेतकºयांना उद्ध्वस्त केले आहे. कपाशी पिक शेतकºयांच्या व्यवहाराचा कणा आहे. मात्र अल्पावधीतच हा कणा मोडला गेला. सुरूवातीला पिकांना गरजेनुसार पाऊस पडत गेल्याने पिके जोमात दिसत होती. यंदा तरी आपल्या डोक्यावरचे कर्जाचे ओझे कमी होईल, अशी आशा बाळगलेल्या शेतकऱ्यांच्या आशेवर परतीच्या पावसाने पाणी फेरले. हिरवागार दिसणाऱ्या कापसाचा आठवडाभरातच धिंगाना झाला. फुल चाफ्यांची गळती होत बोंडही सडले गेले आणि झाडावर फुटलेल्या कापसाला झाडावरच कोंब निघाले. काहींनी कशीबशी कापसाची वेचणी केली.मात्र कापूस पाण्यात भिजल्याने कवडीमोल दरात विकावे लागले. नंतरच्या वेच्याला निघालेला कापूस भाववाढीच्या अपेक्षेने घरातच दाबून ठेवला आहे. परंतु बि-बियाणाच्या लागवडीसाठी घेतलेले बँक कर्ज व सावकारी कर्जासाठी शेतकऱ्यांना तंबी मिळत असल्याने कमी दरातच शेतकऱ्यांना कापूस विकावा लागत आहे. यात शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस