लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना: कोरपना येथील मालगुजारी तलाव सर्व्हे नं. ४९ हेक्टर क्षेत्राचा आहे. मात्र अतिक्रमण व गाळसाठा झाल्याने तलावाचा पाणीसाठा संपुष्टात आला असून धान शेती सिंचनाअभावी बंद पडली आहे. त्या तलावाचा गाळ उपसा सुरू असून त्याची पाहणी करण्यात आली.जिल्हा परिषदेने हा सिंचन तलाव जलसंधारण विभागाला हस्तांतर करावा, अशी मागणी नगरसेवक सुहेल अली यांनी केली होती. सीएसआर निधीतून गाळ उपसा कामाला भेट देऊन आ. अॅड. संजय धोटे यांनी पाहणी केली. कोरपना गावात पाणीटंचाई निर्माण होते. त्याचा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागतो. येथे नळ योजना दोन वेळा मंजूर होऊनसुद्धा पूर्ण झाली नाही. गावात पिण्याचे पाण्यासाठी विहीर नाही. त्यामुळे नागरिक संवाद साधला. त्यानंतर शेतकरी स्वत: गाळाचा वापर शेतीमध्ये करण्यासाठी पुढे आले. कोरपना शिवार जलमय व्हावे म्हणून जलयुक्त शिवार कार्यक्रमातून बंधारे, शेततळे, ढाळीचे बांध, डोह खोलीकरण कामाचे नियोजन करण्याचे निर्देश कृषी व जलसंधारण विभागाला दिले. तसेच तलावाचे हस्तांतर व कामाचे अंदाजपत्र तयार करुन पुढील हंगामात खोलीकरण करण्यात येईल, असे आ. धोटे यांनी सांगितले. यावेळी जनसत्याग्रह संघटनेचे आबिद अली, रमेश मालेकर प्रल्हाद पवार, आशिष ताजने, अरुण मडावी, नूर शेख, झोलबा इंगळे, पुरुषोत्तम भोंगळे, नितीन मोहितकर, मडावी, तलाठी अन्सारी आदींसह शेतकरी उपस्थित होते.
कोरपना तलाव गाळ उपशाची पाहणी
By admin | Updated: June 9, 2017 00:53 IST