खासगी वाहनचालकांनी आपल्या बसमध्ये विविध प्रकारच्या सोयी उपलब्ध केल्याने त्यांच्या बसेसना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. परिणामी महामंडळाच्या बसचे प्रवासी कमी होत होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने काही भागात शिवनेरी तर काही ठिकाणी शिवशाही बसफेऱ्या सुरू केल्या. ही बस पॅकबंद असून यामध्ये एसी आहे. तसेच बस ऑनलाईन तिकीट बुक करता येते. चंद्रपूर जिल्ह्यातून चारही आगारातून अशा पाच शिवशाही बस नागपूर व तुमसर मार्गावर धावतात. पूर्वी या बसला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता. मात्र कोरोनामुळे आता प्रवाशांची संख्या घटली आहे. नागपूर लॉकडाऊन असल्याने नागपूरला जाणाऱ्याची संख्या घटली आहे. त्यामुळे महामंडळाला फटका बसत आहे.
बॉक्स
नागपूर मार्गावरील गाड्या रिकाम्या
चंद्रपूर आगारातून तीन शिवशाही बस नागपूरसाठी धावतात. या बसमध्ये एसी असते. तसेच ही बस पॅकबंद असल्याने साध्या बसपेक्षा या बसचे तिकीट जास्त असते. सर्वसाधारण बसचे नागपूरची तिकीट २०० रुपये तर शिवशाहीचे तिकीट ३०० रुपये आहे. मात्र मागील काही दिवसांपासून नागपूर लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे आपोआपच नागपूर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली आहे. बहुतांश प्रवासी सर्वसाधारण बसचा वापर करीत असल्याचे चित्र आहे.
बॉक्स
उत्पन्नावर परिणाम
कोरोनाच्या पूर्वी अनेकजण शिवशाही बसने प्रवास करायचे. तालुका स्थळावरसुद्धा या बसची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत होती. मात्र कोरोना आल्याने प्रवाशांची संख्या घटली आहे. त्यामुळे महामंडळांच्या उत्पन्नावर आपोआपच परिणाम पडला आहे.
बॉक्स
जिल्ह्यातील शिवनेरी बसेसची संख्या
५
सध्या सुरू असलेल्या शिवनेरी
५