बुधवार व रविवारच्या बाजारावर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 05:00 AM2020-09-25T05:00:00+5:302020-09-25T05:00:29+5:30

मागील काही वर्षापासून आनंदवन ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतच्या जागेमध्ये बुधवार या आठवडी बाजाराला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर बुधवार ऐवजी रविवारला बाजार भरविण्यात येत होता. त्यामुळे किरकोळ दुकानदारांनी आनंदवन चौकापासून चिमूर मार्गालगत बुधवार बाजार सुरू केला.

Corona stock market on Wednesday and Sunday | बुधवार व रविवारच्या बाजारावर कोरोनाचे सावट

बुधवार व रविवारच्या बाजारावर कोरोनाचे सावट

Next
ठळक मुद्देआनंदवन चौक : बाजारात होत होती लाखोंची उलाढाल

लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : आनंदवन चौकामधून चिमूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा आठवड्यातून रविवार व बुधवार या दिवसात बाजार भरत होता. कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता बुधवार व रविवारचा बाजार प्रशासनाने बंद केला आहे. त्यामुळे या ठिकाणी आता शुकशुकाट पसरला आहे. दरम्यान, लाखो रुपायांची उलाढाल बंद झाली आहे.
मागील काही वर्षापासून आनंदवन ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायतच्या जागेमध्ये बुधवार या आठवडी बाजाराला सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर बुधवार ऐवजी रविवारला बाजार भरविण्यात येत होता. त्यामुळे किरकोळ दुकानदारांनी आनंदवन चौकापासून चिमूर मार्गालगत बुधवार बाजार सुरू केला. कोरोनाच्या सावटाने ग्रामपंचायतच्या जागेवरील रविवार बाजार बंद केल्याने बुधवार व रविवार या दोन दिवसात चिमूर रस्त्यालगत मागील कित्येक दिवसापासून बाजार भरत होता. कोरोनाचे संक्रमण वाढत असताना या दोन्ही दिवसात नागरिक बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी करीत होते. या बाजारावर कुठलेही नियंत्रण नसल्याने रस्त्याच्या कडेला व्यवस्थीत जागा नाही. अगदी चिमूर मार्गाला लागून आठवड्यातून दोन दिवस बाजार भरत असल्याने या दोन्ही दिवसात वाहतूक कोंडी होत होती. वाहने पार्किंगला जागा नसल्याने रस्त्यावर वाहने उभे करून बाजार भरत होता. बाजार झाल्यानंतर त्या जागेची स्वच्छता होत नसल्याने त्या परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. प्रशासनाने या बाजाराबाबत चौकशी करणे सुरू केले असता कुठलीही मान्यता नसल्याचे लक्षात आले. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने सदर बाजार प्रशासनाने बंद केला. यामुळे नागरिकांची निराशा झाली असून व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे बाजार सुरु करण्याची मागणी करण्यात आली आहे.

कोरोनामुळे बाजार बंद आहे. सदर बाजाराला बोर्डा ग्रामपंचायतीने परवानगी दिली नाही. बोर्डा ग्रामपंचायतच्या जागेवर बाजार भरत नसल्याचे प्रशासनाला कळविण्यात आले आहे.
- यादव चाफले
ग्रामविकास अधिकारी
ग्रामपंचायत, बोर्डा

Web Title: Corona stock market on Wednesday and Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Marketबाजार