शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरावर कोरोनाची छाया गडद : मागील पाच दिवसात वाढले ११०२ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 15:38 IST

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाने कहर करणे सुरू केले आहे. प्रत्येक ठिकाणी कोरोना शिरकाव करीत आहे. मागील पाच दिवसात वाढलेल्या कोरोना बाधितांचा आकडा बघितला तर धक्काच बसतो.

ठळक मुद्देकेवळ पाच दिवसात हजारी पार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाने कहर करणे सुरू केले आहे. प्रत्येक ठिकाणी कोरोना शिरकाव करीत आहे. मागील पाच दिवसात वाढलेल्या कोरोना बाधितांचा आकडा बघितला तर धक्काच बसतो. केवळ पाच दिवसात जिल्ह्यात तब्बल ११०२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात चंद्रपूर शहरातील रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. चंद्रपुरात कोरोनाची छाया आणखी गडद होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे.तरुणांनाच कोरोनाची अधिक बाधा होत असल्याने तरुणांनी आता गंभीर होणे गरजेचे झाले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी दैनंदिन व्यवहारही सुरू राहणे आवश्यक आहे. मात्र कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. मात्र समाजात वावरताना तरुणवर्ग बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे. कोरोना वगैरे काही नाही, आपल्याला कोरोनाची बाधा होत नाही, अशा अविर्भावात अनेक तरुणमंडळी वावरताना दिसतात. त्यामुळे संपर्कातून त्यांनाच कोरोनाची अधिक बाधा होत आहे.

बाधितांमध्ये तरुणांची संख्या अधिक असली तरी कोरोनाचा संसर्ग सर्व वयोगटातील व्यक्तींना होत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक झाले आहे. मागील पाच दिवसांचा विचार केला तर या पाच दिवसात तब्बल ११०२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ३१ ऑगस्टला २०३ रुग्ण आढळून आले. १ सप्टेंबरला २१६, २ सप्टेंबरला १८२, ३ सप्टेंबरला २२२ तर ४ सप्टेंबरला तर तब्बल २७९ रुग्ण आढळून आले. ही संख्या सर्वाधिक आहे.

अनलॉक म्हणजे वाट्टेल तसे वागणे नव्हेकोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून सध्यातरी माक्स लावणे, वारंवार हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे हाच एकमेव उपाय आहे. राज्य शासन व आरोग्य विभाग सातत्याने हेच नागरिकांना सांगत आहे. नागरिकांचा रोजगार सुरू रहावा, देशाची आर्थिक स्थिती बरी रहावी, यासाठी अनलॉक सुरू करण्यात आले आहे. मात्र हे करताना काही बंधने घालून नागरिकांना बाहेर निघण्याची मुभा देण्यात आली. मात्र अनेकजण अनलॉकचा अर्थ म्हणजे पूर्वीसारखेच वाट्टेल तसे वागणे, असा समजत आहे की काय, असे चित्र शहरात दिसून येत आहे.१०० खाटांचे कोविड सेंटर उभारा: जिल्हाधिकारीचंद्रपूर  जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात लिक्विड व ऑक्सीजन प्लान्ट उभे करण्याची कारवाई तत्काळ करावी. तसेच १०० खाटांचे अद्ययावत कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस