कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केले ‘भीक मांगो आंदोलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:26 AM2021-01-22T04:26:24+5:302021-01-22T04:26:24+5:30

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुमारे ५०० कंत्राटी कामगारांना मागील सहा महिन्यांपासून थकीत मिळाले नाही, असा ...

Contract workers launch 'Bhik Mango Andolan' | कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केले ‘भीक मांगो आंदोलन’

कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केले ‘भीक मांगो आंदोलन’

googlenewsNext

चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सुमारे ५०० कंत्राटी कामगारांना मागील सहा महिन्यांपासून थकीत मिळाले नाही, असा आरोप करून कंत्राटी कामगारांनी जनविकास कामगार संघाच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी २ वाजता गांधी चौक, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जटपुरा गेट व कोविड रुग्णालयासमोर ठिय्या मांडून कंत्राटी कामगारांनी ‘भीक मांगो आंदोलन’ केले. आंदोलनातून जमा झालेले ४०२७ रुपये जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करून राज्य सरकारचा निषेध केला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी वेतनाविना कर्तव्य बजावत आहेत. मात्र, सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप कामगारांनी केला. ‘भीक मांगो आंदोलना’दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडण्यात आला. जमा झालेले ४०२७ रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याचे जाहीर केले. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन देऊन त्यांच्या सूचनेनुसार धनादेशाच्या स्वरूपात निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांच्याकडे जनविकास सेनेचे प्रफुल बैरम यांच्या नावाने सुपूर्द करण्यात आला. यावेळी जनविकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख, सतीश येसांबरे, कांचन चिंचेकर, अनिल दहागावकर,राहुल दडमल, ज्योती कांबळे, नीलिमा वनकर, अमोल घोडमारे आदी उपस्थित होते.

Web Title: Contract workers launch 'Bhik Mango Andolan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.