शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

विकासकामांची गंगा अशीच सुरु ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 5:00 AM

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात सोमवारी आयोजित महापौर पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर नवनिर्वाचित महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपमहापौर राहुल पावडे, बल्लारपूर नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी महापौर अंजली घोटेकर, गटनेता वसंत देशमुख, उपायुक्त गजानन बोकडे, महिला व बालकल्याण सभापती शितल गुरनुले, उपसभापती चंद्रकला सोयाम आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : राखी कंचर्लावारांनी स्वीकारला महापौर पदाचा पदभार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानगरपालिकेत आता नवे महापौर, उपमहापौर विराजमान झाले आहेत. त्यांनी चंद्रपूर शहरात विकासकामांची गंगा अशीच अविरत सुरू ठेवावी, अशा सूचना माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहात सोमवारी आयोजित महापौर पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर नवनिर्वाचित महापौर राखी कंचर्लावार, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, उपमहापौर राहुल पावडे, बल्लारपूर नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी महापौर अंजली घोटेकर, गटनेता वसंत देशमुख, उपायुक्त गजानन बोकडे, महिला व बालकल्याण सभापती शितल गुरनुले, उपसभापती चंद्रकला सोयाम आदी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, माजी महापौरांनी आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट कार्य केले. अडीच वर्षाच्या कार्यकाळात शहराच्या विकासासाठी त्यांनी मन: पूर्वक प्रयत्न केले आणि आता पुढील अडीच वर्षांसाठी महापालिकेला वेगळे काही करण्याची मानसिकता लाभलेल्या व योग्य ते निर्णय अंमलात आणण्याची क्षमता असलेल्या महापौर लाभल्या आहेत. असे असले तरी शहराची गरज आणि नागरिकांच्या अपेक्षांकडे लक्ष देणे गरजेचे राहील, विकासकामांची आठवण नागरिक दीर्घकाळ ठेवतील. त्यामुळे महापौर राखी कंचर्लावार यांनी असे कामे करणे अपेक्षित आहे. आता जरी सत्तेत नसलो तरी विकासकामांकरिता निधी खेचून आणण्याचा निश्चित प्रयत्न करू. समाजाच्या महत्त्वाच्या गरज पूर्ण करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. चार भिंतीआड निर्णय घेण्यापेक्षा जनतेला अपेक्षित, त्यांना गरज असणारे निर्णय घेण्यात यावे. नवनिर्वाचित महापौरांच्या मागील कार्यकाळात जी-जी कामे राहून गेलीत, ती सर्व कामे सर्व नगरसेवक, मनपाचे सर्व कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, आयुक्त यांच्या सहकार्याने करून विकासाची ही घोडदौड सुरुच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.पदग्रहण समारंभाच्या मुख्य कार्यक्रमापूर्वी महापौर राखी कंचर्लावार यांनी मावळत्या महापौर अंजली घोटेकर यांच्याकडून पदभार स्वीकारला.चंद्रपूर शहर अधिक स्वच्छ व सुंदर करण्यावर आपला भर राहील, असे महापौर राखी कंचर्लावार म्हणाल्या.विश्वास टाकून दिलेल्या संधीचे सोने करीन-राखी कंचर्लावारसंघटनेत काम करताना महापौरपदासारखी मोठी जबाबदारी पुन्हा एकदा मिळेल, असे वाटले नव्हते. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी विश्वास टाकून दिलेल्या या संधीचे सोने करीन. पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरणार असून चंद्रपूर शहर अधिक स्वच्छ व सुंदर करणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित महापौर राखी कंचलार्वार यांनी दिली. महिलांमध्ये प्रत्येक भूमिकेला न्याय देण्याची एक उपजत शक्ती असते. विकासासाठी केलेली चांगली कामे जनतेच्या कायम लक्षात राहत असल्याने महापौरपदाच्या या कार्यकाळात उत्कृष्ट आणि पारदर्शक काम करणार, विकासाचा जो आदर्श आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी घालून दिला आहे. त्या विकासाच्या मार्गावर मार्गक्रमण करीत राहाणार असल्याचेही त्या म्हणाल्या. महिला या नात्याने चंद्रपूर शहर स्वच्छ ठेवणे ही प्राथमिक जबाबदारी आहे. या आधीच्या माझ्या कार्यकाळात घरोघरी कचरा संकलनास घंटागाडी चालू केली, घरोघरी शोचालये केली, मोडकळीस आलेल्याशोचालयाच्या जागी अभ्यासिका उभारली, गणेश विसर्जनादरम्यान कृत्रिम विसर्जन कुंड व निर्माल्य कलश उभारून शहर स्वच्छ राखण्यास अभिनव उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला, असेही त्या म्हणाल्या.‘अमृताची घागर’ उपक्रम राबविणारमागील पाच वर्षात माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी जो विकासकामांचा धडाका लावला, त्यामुळे शहराची प्रगती वेगाने होण्यास मदत लाभली आहे. यापुढे रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रत्येक घरी राबविण्याला प्राधान्य देणार असून भूगर्भातील हा अमृत जलसाठा चिरकाल टिकून राहण्यासाठी प्रसंगी कठोर पाऊले उचलण्यास मागे पुढे पाहणार नाही. घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग व्हावे, याकरिता 'अमृताची घागर' स्पर्धा राबविण्याचा मानस महापौर कंचर्लावार यांनी बोलून दाखविला. ज्या वार्डात अधिकाधिक घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग झाले असेल त्या वॉर्डला मोठं बक्षीस देऊन पुरस्कृत करण्यात येईल.स्वच्छ वार्डाला पुरस्कारयाप्रसंगी स्वच्छ वॉर्ड स्पर्धेतील विजेत्या वार्डांना बक्षिसे देण्यात आली. यात ३० लाखाचे प्रथम पारितोषिक दे. गो. तुकूम प्रभाग क्र. १ ला मिळाले, २० लाखांचे द्वितीय बक्षीस वडगाव प्रभाग क्र. ८ ला तर १५ लाखांचे तृतीय पारितोषिक भानापेठ प्रभाग क्र. ११ ला मिळाले. आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रभागक्षेत्रातील नगरसेवकांना धनादेश व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.

टॅग्स :Socialसामाजिक