शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

कोलाम बांधव पितात नाल्यातील दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 23:11 IST

तालुक्यातील बगलवाही या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील वन जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्य करणारे आदिवासी वनवासी कोलाम आजही नाल्यातील झऱ्याच्या पाण्यावर जीवन जगत आहे.

ठळक मुद्देसवलतीपासून वंचित : हातपंप खोदकामाला वनविभागाची आडकाठी

आनंद भेंडे।लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा : तालुक्यातील बगलवाही या अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील वन जमिनीवर अतिक्रमण करून वास्तव्य करणारे आदिवासी वनवासी कोलाम आजही नाल्यातील झऱ्याच्या पाण्यावर जीवन जगत आहे. त्यांना शासनातर्फे मुलभूत सोयी सवलती पंचायत समितीकडून देण्याचा प्रयत्न वनविभागाच्या राखीव वनामुळे असफल ठरला आहे. त्यांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हातपंप सुद्धा खोदण्यास मनाई केल्यामुळे सुमारे १० वर्षांपासून नाल्याच्या पाण्यावर जीवन जगत आहे. त्यामुळे आतापर्यंत तेथील नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.बगलवाही हे जुने रिठ असून कोलामांच्या वास्तव्याचे बºयाच वर्षापुर्वी ठिकाण होते. परंतु त्यांच्या रितीरिवाजाप्रमाणे एखादा व्यक्ती मरण पावल्यास स्थानांतर करणे, ही त्याची प्रथा आहे. सध्या बगलवाही येथे दोन गुड्यात जवळपास ३५-४० घरे असून २०० लोकांची संख्या आहे. सन २००० मध्ये डोंगरगाव धरणाच्या बुडीत क्षेत्रात त्याच्या जमिनी गेल्यामुळे इतरत्र स्थानांतर झाले. काही कोलामांचे मूर्ती या गावी शासनाने स्थानांतर केले. कोलामांचे वास्तव्य सामान्य जनतेपासून दूर राहणे, जंगलापासून जीवन जगणे ही त्यांची संस्कृती आहे. जंगलातील बांबूपासून तट्टे, ताटवे बनवून आपली उपजिविका करतात. तसेच थोड्या फार वन जमिनीवर अतिक्रमण करून शेती करतात. याच उद्देशाने बगलवाही येथील वन जमिनीवर अतिक्रमण करून जीवन जगत आहेत.सन २०११ मध्ये बगलवाही येथील कोलामांचे घर उद्ध्वस्त करून त्यांना बेघर करण्यात आले होते. परंतु श्रमिक एल्गारच्या नेत्या पारोमिता गोस्वामी यांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्य वनसंरक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. त्यामुळे त्यांना त्याच जागेवर स्थायी करण्यात आले. त्यानंतर मुलभूत सोयी सवलती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न लोकप्रतिनिधी व पंचायत समिती राजुराकडून करण्यात आले. परंतु, वन विभागाकडून त्यांना मनाई करून ग्रा.पं.कडून लावलेले सौर उर्जाचे लाईट जुलै २०१६ मध्ये काढण्यात आले. हातपंप खोदण्यासाठी पाठविलेली गाडी सुद्धा परत आली. त्याचा परिणाम आजही नागरिक नाल्यात खड्डा खोदून झºयाच्या पाण्यावर जीवन जगत आहे. हे वास्तव्य आहे. त्यामुळेच आजपर्यंत विविध आजाराने येथील नऊ जणांचा मृत्यू झाला.कोस्टाळा ग्रामपंचायतने पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभेत ठराव पास करून स्वतंत्र गुडा घोषीत करण्याची मागणी जिल्हाधिकारी व वनविभागाकडे केली आहे. तसेच भौतिक सुविधा पुरविण्यासाठी मंजुरी देण्याची मागणी केली आहे. वन जमिनीवर अतिक्रमण असल्यामुळे भौतिक सुविधा पुरवण्यासाठी वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्राअभावी आजही जैसे थे स्थिती आहे.- डॉ. ओमप्रसाद रामावत,गट विकास अधिकारी, पंचायत समिती, राजुरा.