शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

तळोधीत आठ पेट्या विदेशी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 00:22 IST

तळोधी (बा.) पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी करून पोलिसांनी आठ पेट्या विदेशी दारू जप्त केली. यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून दोन लाख ८१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा.): तळोधी (बा.) पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या वाहनाची तपासणी करून पोलिसांनी आठ पेट्या विदेशी दारू जप्त केली. यामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून दोन लाख ८१ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.तळोधी मार्गाने अवैध दारूची तस्करी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहनांची तपासणी सुरु केली. दरम्यान, रस्त्यावर पोलीस बघताच एमएच ३१ सीएन १३९१ च्या चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र चारही बाजून पोलिसांनी नाकाबंदी केल्यामुळे त्याला पळून जाणे शक्य झाले नाही. दरम्यान पोलिसांनी वाहनचालक मयुर संजय मानकर (२३) नागपूर याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडून आठ विदेशी दारुच्या पेट्या हस्तगत केल्या असून वाहनासहीत दोन लाख ८१ हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला. सदर कारवाई तळोधी (बा.) पी. एस. आय. आकाश साखरे यांच्या नेतृत्वात एस. सी. सोनटक्के, एस.सी. चनेकर, नेवारे, धुडसे, संजय मांढरे आदींनी केली. या कारवाईमुळे दारु तस्करांचे धाबे दणाणले असून काही प्रमाणात का, होईना आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गावातीलही दारू तस्करांच्या मुस्क्या आवळाव्या, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस