१६ नवीन पूल उभारल्याने टळले पुराचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 05:00 AM2020-10-01T05:00:00+5:302020-10-01T05:00:22+5:30

पावसाळ्यातील अडचणी लक्षात घेवून मागील सरकारने अर्थसंकल्पात २६ नवीन पुलांसाठी निधीची तरतूद केली होती. यातील हळदी ते नलेश्वर मार्गावरील ३ पुलांचे बांधकाम पूर्ण झाले. चिचाळा ते कवळपेठ मार्गावरील २, जानाळा ते सुशी मार्गावर २, नवेगाव-कोरंबी-बेंबाळ मार्गावर ३, मूल ते चामोर्शी एक, चिखली ते कन्हाळगाव मार्गावर एक, पेठगाव भादुर्णी मार्गावर २, फिस्कुटी ते गडीसुर्ला मार्ग आणि सितळा ते फिस्कुटी येथील प्रत्येकी एक पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.

Construction of 16 new bridges avoids floods | १६ नवीन पूल उभारल्याने टळले पुराचे संकट

१६ नवीन पूल उभारल्याने टळले पुराचे संकट

Next
ठळक मुद्देनागरिक समाधानी : २६ नवीन पुलांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद

भोजराज गोवर्धन ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : तालुक्यातील काही पुलांची उंची नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात मार्ग बंद राहत होते. काही गावांना पुराचा फटका बसत होता. नागरिकांना ये-जा करण्यास मोठी कसरत करावी लागत होती. मात्र, नवीन १६ पुलांचे बांधकाम पूर्ण झाल्याने संकटातून मुक्ती मिळाली आहे. वाहतुकीचा मार्ग सुरळीत असल्याने पावसाळ्यातील दळणवळणास अडचणी आल्या नाही.
पावसाळ्यातील अडचणी लक्षात घेवून मागील सरकारने अर्थसंकल्पात २६ नवीन पुलांसाठी निधीची तरतूद केली होती. यातील हळदी ते नलेश्वर मार्गावरील ३ पुलांचे बांधकाम पूर्ण झाले. चिचाळा ते कवळपेठ मार्गावरील २, जानाळा ते सुशी मार्गावर २, नवेगाव-कोरंबी-बेंबाळ मार्गावर ३, मूल ते चामोर्शी एक, चिखली ते कन्हाळगाव मार्गावर एक, पेठगाव भादुर्णी मार्गावर २, फिस्कुटी ते गडीसुर्ला मार्ग आणि सितळा ते फिस्कुटी येथील प्रत्येकी एक पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
काही पुलांचे काम अंतिम टप्प्यात आहे. बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले यांच्या मार्गदर्शनात शाखा अभियंत्यांनी कर्तव्य बजावल्याने पुलांची कामे विहित कलावधीतच पूर्ण होवू शकले. रस्ता रूंदीकरणाचे काम काही दिवसात पूर्ण होणार नागरिकांना ये-जा करण्यासाठी सुलभ होणार आहे.

Web Title: Construction of 16 new bridges avoids floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.