शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

जिल्ह्यात काँग्रेसची घसरण

By admin | Updated: October 19, 2014 23:51 IST

एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यावेळी मात्र या पक्षाची प्रचंड घसरण झाली आहे. ब्रह्मपुरीच्या रूपाने केवळ एकमेव जागा राखून ठेवण्यात विजय वडेट्टीवार यांना यश आले आहे.

चंद्रपूर : एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात यावेळी मात्र या पक्षाची प्रचंड घसरण झाली आहे. ब्रह्मपुरीच्या रूपाने केवळ एकमेव जागा राखून ठेवण्यात विजय वडेट्टीवार यांना यश आले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात विधानसभेच्या एकूण सहा जागा आहेत. गेल्या २००९ च्या विधानसभेत येथे तीन ठिकाणी काँग्रेस आणि तीन ठिकाणी भाजपा अशी समसमान स्थिती होती. यावेळी भाजपाची जागा एकने वाढली. शिवसेनेलाही वरोऱ्यात संधी मिळाली. काँग्रेसला राजुऱ्यात संधी होती. मात्र अगदी कमी फरकाने पक्षाला ही जागा गमवावी लागली. वरोरा, चंद्रपुरात तर काँंग्रेसचा उमेदवार अनपेक्षितपणे तिसऱ्या क्रमावर फेकला गेला. चिमुरातही संधी होती. पक्षाकडून योग्य नियोजन झाले असते तर, कदाचित चित्र वेगळे राहिले असते. भाजपाने वरोऱ्यात केलेली राजकीय खेळी कामी आली. या खेळीने एका दगडात दोन पक्षी मारण्याचे काम केले. काँग्रेसच्या परंपरागत बालेकिल्ल्याला खिंडार पाडले आणि दुसरे म्हणजे भाजपा उमेदवाराला या मतदार संघात दुसऱ्या स्थानावर पोहचविण्याची संधी संजय देवतळे यांना पुढे करून मिळविली. यात नुकसान काँग्रेसचे झाले आणि फायदा मात्र शिवसेनेच्या उमेदवाराचा झाला. गेल्या दोन निवडणुकांपासून सुरू असलेल्या बाळू धानोरकरांच्या प्रयत्नांची सार्थकता या निवडणुकीने केली. विशेष म्हणजे, संजय देवतळे यांच्या उमेदवारीने ती पूर्ण झाली.