शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

काँग्रेसने दिला आंदोलन करण्याचा इशारा

By admin | Updated: February 27, 2017 00:37 IST

गाडेगाव-विरूर येथे वेकोलिच्या कामासाठी गडचांदूर उपविभागातून वीज प्रवाह वाहनू नेण्याचे कार्य सुरु आहे.

जीवितहानीची शक्यता : नांदाफाट्यात भर चौकातून ३३ के.व्ही. विद्युत केबलकोरपना : गाडेगाव-विरूर येथे वेकोलिच्या कामासाठी गडचांदूर उपविभागातून वीज प्रवाह वाहनू नेण्याचे कार्य सुरु आहे. त्यासाठी नांदाफाटा येथील मुख्य चौकात तीन महिन्यांपूर्वी आवारपूरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला तीन फूट अंतरावर २ ते २.५ फूट खोल ३३ के.व्ही. क्षमतेचे विद्युत केबल टाकण्यात आले. इतक्या जवळून केबल टाकल्याने व जास्त खोली नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. भूमिगत केबल टाकण्यात यावे अन्यथा काम होऊ देणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या वतीने देण्यात आला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे २२ फेब्रुवारी रोजी म.रा. विद्युत वितरण कंपनीला केबल टाकण्यासाठी परवानगी देण्यात आली. यापरवानगीत केबल १.६५ मीटर जमिनीच्या खाली टाकण्यात यावे, अशी अट टाकण्यात आली. परंतु कंत्राटदाराने परवानगी घेण्यापूर्वीच केबल रस्त्याच्या कडेला लागूनच तीन फुटाच्या अंतरावर फक्त २ ते २.५ फूट खोल आत टाकलेले आहे. हे काम नियमबाह्य असून त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. हे केबल काढून परवानगीनुसार १.६५ मीटर खोलीकरण करून रस्त्यापासून १० फूट दूर अंतरावर केबल टाकण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसने निवेदनाद्वारे केली आहे.सद्या अल्ट्राटेक प्रवेशद्वाराजवळ ३३ के.व्ही. लाईन ओवरहेड टाकण्यात येत आहे. हे ठिकाण वर्दळीचे असून उभे करण्यात येणारे खांब मुख्य रस्त्यावर येत आहेत. परिणामी मोठ-मोठ्या वाहनांच्या वर्दळीमुळे वाहन खांबाला आदळून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याठिकाणाहून भूमिगत केबल टाकण्यात यावे. लोकांच्या हितासाठी नियमानुसार काम न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे, युवक कॉंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आशिष देरकर, आवारपूरच्या सरपंच सिंधू परचाके, नांदा शहराध्यक्ष तथा ग्रा. पं. सदस्य अभय मुनोत, विलास राजगडकर, भीमराव आसनपल्लीवार, मो. हारून सिद्दिकी, सुमेंदर ठाकूर, रवी बंडीवार, अरविंद इंगोले आदींनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)