शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

एकजुट काँग्रेस-राष्ट्रवादीची, पण विजय भाजपचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 00:02 IST

२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार मितेशकुमार भांगडिया यांनी अत्यल्प संख्याबळ असताना २०० मतांच्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहुल पुगलिया यांचा पराभव केला होता.

चंद्रपूर : चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदार संघाची निवडणूक जिंकून भाजपला गड राखण्यात यश आले खरे, परंतु एकतर्फी निवडणुकीचे चित्र असताना भाजपला विजयासाठी चांगलीच कसरत करावी लागली. दोन्ही उमेदवारांत केवळ ३७ मतांचा फरक बघता या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, अन्य पक्ष व अपक्षांची एकजुट झाल्याचे दिसून येते. आणि ही एकजुट आगामी निवडणुकांसाठी भाजपला धोक्याची घंटाच आहे.२०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप उमेदवार मितेशकुमार भांगडिया यांनी अत्यल्प संख्याबळ असताना २०० मतांच्या फरकाने काँग्रेसचे उमेदवार राहुल पुगलिया यांचा पराभव केला होता. त्या निवडणुकीत काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली होती. या निवडणुकीत काँग्रेसने संख्याबळ कमी असताना ४९१ मतांपर्यंत मजल मारली.या मतदार संघात भाजप ४८३, शिवसेना ४५, काँग्रेस २४९, राष्ट्रवादी काँग्रेस ७१ आणि अपक्ष व इतर पक्ष मिळून २११ असे एकूण १०५९ मतदार होते. मतांच्या आधारे भाजपचेच पारडे जड होते. भाजपचे सर्व आघाड्यांवरील नियोजन बघता मोठ्या फरकाने भाजपा उमेदवार विजयी होतील, असे चित्र होते. निकालाअंती भाजप उमेदवार रामदास आंबटकर यांना ५२८ आणि काँग्रेस उमेदवार इंद्रकुमार सराफ यांना ४९१ मते मिळाली. केवळ ३७ मतांचा फरक विचारात घेता या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराने कडवी झुंज दिल्याचे स्पष्ट झाले. भाजपकडून रामदास आंबटकर यांच्या नावावर काही महिन्यांपूर्वीच शिक्कामोर्तब झाले होते. काँग्रेसची खेळी जाणून घेण्यासाठी भाजपने अखरेच्या क्षणापर्यंत उमेदवाराचे नाव गुप्त ठेवले होते. काँग्रेस गोटात मात्र उमेदवाराचीच वानवा होती. मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होतो, या पुर्वानुभवाच्या आधारे काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास दमदार उमेदवार पुढे येण्यास कचरत होता. ही बाब हेरून भाजपने संघाचे सक्रिय कार्यकर्ते रामदास आंबटकर यांच्या नावावर बाजी लावली.इकडे काँग्रेस नेते उमेदवाराच्याच शोधात होते. नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या काही तासांपूर्वी काँग्रेसने अपक्ष म्हणून नामांकन दाखल करायला आलेल्या इंद्रकुमार सराफ यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदMaharashtraमहाराष्ट्र