शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूरच्या खासदारांचा बंगला चोरट्यांनी फोडला; साहित्याची नासधूस, तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2022 10:27 IST

सकाळी नेहमीप्रमाणे चौकीदार साफसफाई करण्यासाठी गेला असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी भ्रमणध्वनीवरून खासदार धानोरकर यांनी घरफोडीची माहिती दिली.

चंद्रपूर : खासदार बाळू धानोरकर यांचा सूर्यकिरण नावाचा बंगला चोरट्यांनी फोडल्याची घटना बुधवारी (दि. २७) सकाळी उघडकीस आली. चोरट्याच्या हाती काही लागले नसले तरी चोरट्यानी कपाट फोडून साहित्याची नासधूस केली. यातील तीन आरोपींना १२ तासांत रामनगर पोलिसांना अटक करण्यात यश आले असले तरी या घटनेने पुन्हा एकदा चंद्रपुरातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रोहित इमलकर (२४), शंकर नेवारे (२०, दोघेही रा. दुर्गापूर), तन्वीर बेग (२०, भंगाराम वॉर्ड, चंद्रपूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

खासदार बाळू धानोरकर यांचा सरकार नगर येथे सूर्यकिरण नावाचा बंगला आहे. मंगळवारी रात्री ते वरोऱ्याला मुक्कामी होते. त्यांचा सुरक्षारक्षक व त्यांची पत्नी गाठ झोपेत होते. हीच संधी साधून मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बंगाल्याच्या सुरक्षा भिंतीवरून उडी मारून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी मुख्य दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

बंगल्यातील इतर खोल्यांचेही कुलूप तोडले. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. त्यामुळे उद्विग्न होऊन त्यांनी सामानाची नासधूस केली, कपाट फोडले. सकाळी नेहमीप्रमाणे चौकीदार साफसफाई करण्यासाठी गेला असता त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी भ्रमणध्वनीवरून खासदार धानोरकर यांनी घरफोडीची माहिती दिली. या घटनेची तक्रार चौकीदाराने रामनगर पोलिसांत दाखल केली. त्यानंतर पोलीस यंत्रणा मोठा फौजफाटा खासदारांच्या बंगल्यावर पोहोचला.

बंगल्यातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा तीन युवक कुलूप तोडून आत प्रवेश करताना दिसले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली. १२ तासांच्या आता तिघांनाही जेरबंद केले. खासदारांच्या बंगल्यातून खाली हात परतल्याने या तिघांनी या परिसरातील आणखी दोन घरे फोडली असल्याची माहिती आहे. चक्क खासदारांचे घर सुरक्षित नसल्याने जनसामान्यांचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूरtheftचोरी