शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

विसापूर ग्रामपंचायतीत काँग्रेस-भाजपात सत्ता संघर्ष

By admin | Updated: July 23, 2015 00:53 IST

बल्लारपूर तालुक्यात विसापूर ग्रामपंचायत सर्वात मोठी आहे. यामुळे राजकीय पक्षाने येथील राजकारणावर लक्ष ..

ग्रामपंचायत निवडणूक : आज होणार उमेदवारांचे चित्र स्पष्टबल्लारपूर: बल्लारपूर तालुक्यात विसापूर ग्रामपंचायत सर्वात मोठी आहे. यामुळे राजकीय पक्षाने येथील राजकारणावर लक्ष केंद्रीत केले आहे. येथील १७ जागेसाठी तब्बल ६८ उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल करुन विक्रम केला आहे. उद्या गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्याचवेळी उमेदवारांचे चित्र स्पष्ट होणार असून विसापूर ग्रामपंचायतीच्या राजकारणात काँग्रेस भाजपात सत्तासंघर्ष दिसून येत आहे.विसापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग एक मध्ये नामाप्र जागेसाठी एकूण पाच उमेदवारांनी नामांकन दाखल केले. येथे काँग्रेसचे सचिन टोंगे व भाजपाचे विलास भोयर यांच्यात सामना आहे. याच प्रभागातील अनुसूचित जाती महिला राखीव जागेसाठी सहा महिलांनी एका जागेसाठी दावा केला. लढत मात्र रिता जिलठे व पुष्पा खैरकर यांच्यात होण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी शारदा डाहुले व गीता उलमाले एकमेकींना आव्हान देत आहेत. येथील प्रभाग दोनमध्ये नामाप्र महिला राखीव जागेसाठी वैष्णवी पिंपळकर आणि निता वनकर यांच्यात संघर्ष आहे. सर्वसाधारण जागेवर विनोद गिरडकर व प्रमोद ठाकूर यांच्यात दुहेरी लढत आहे.येथील प्रभाग तीनमधील अनुसूचित जाती वर्गाच्या एका जागेसाठी एकूण पाच उमेदवार असलेतरी मुख्य सामना विजय वैद्य व सरोज गाडगे यांच्यात होण्याची शक्यता आहे. येथील नामाप्र राखीव जागेवर चार उमेदवारांपैकी सुनिल रोंगे व रवींद्र कोट्टलवार यांच्यात लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर तीनपैकी सुरेखा कोडापे व विमला कोव ेयांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे. प्रभाग चारमध्ये अनुसूचित जमाती राखीव जागेसाठी सहा जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये सन्नी टेकाम व प्रकाश सिडाम यांच्यात लढतीचे चित्र आहे. अनुचूचित जाती महिला राखीव एका जागेसाठी चौघीनी दावा केला. मात्र सुरेखा दुर्गे व सरला भोयर यांच्यात संघर्ष दिसून येते. याच प्रभागात नामाप्र महिला राखीव जागेवर मालन कोडेकर व सुरेखा इटनकर यांच्यातील लढत लक्षवेधी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रभाग पाचमध्ये अनुसूचित जातीच्या एका जागेसाठी चौघांनी उमेदवारी दाखल केली. मात्र लढत तिरंगी होण्याची शक्यता असून प्रशांत चिकाटे यांना दिनेश पुडके व भारत जीवने शह देण्याचा प्रयत्न करीत आहेत. नामाप्र महिला राखीव जागेवर सरीता झाडे व शारदा पेटकर यांच्यात लढतीचे चित्र निर्माण झाले.प्रभाग सहामधील अनुसूचित जमाती महिला राखीव जागेवर उज्वला कोडापे व सुजिता कोरवते, सर्वसाधारण महिला जागेसाठी मुक्ताबाई रोहणकर व मिना जुमनाके तर सर्वसाधारण जागेसाठी गौचरज नाग व अशोक थेरे यांच्यात लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. (शहर प्रतिनिधी) ८ हजार ९५३ मतदार करतील मतदानविसापूर ग्रामपंचायतीच्या ४ आॅगस्ट रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण मतदारांची संख्या ८ हजार ९५३ इतकी आहे. यात चार हजार ६२४ पुरुष व ४ हजार ३२९ महिला मतदारांचा समावेश आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी एकूण सहा प्रभागासाठी प्रत्येकी दोन असे एकूण १२ मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. येथील प्रभाग एकमध्ये एक हजार ६७१, प्रभाग दोन ९७८, प्रभाग तीन सर्वाधिक एक हजार ९०९, प्रभाग चार एक हजार ५७३, प्रभाग पाच एक हजार ४१९ तर प्रभाग सहामध्ये एकूण एक हजार ४०३ मतदारांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे.चार रंगात राहणार मतपत्रिकेचा नमुनाराज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण चार रंगात मतपत्रिकेचा नमुना ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वसाधारण जागेसाठी पांढऱ्या रंगाची, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी फिका पिवळा, अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी फिका हिरवा व अनुसूचित जाती प्रवर्गासाठी फिका गुलाबी रंगाच्या मतपत्रिकेचा नमुना राहणार आहे. मतदारांना पसंतीच्या उमेदवारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सदर सुविधा निर्माण करण्यात आली आहे.