शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
4
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
5
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
6
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
7
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
8
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
9
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
10
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
11
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
12
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
13
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
14
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
15
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
16
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
17
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
18
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
19
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
20
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

देशातील सर्वोत्तम सैनिकी शाळेच्या वास्तूचे काम पूर्णत्वाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 22:43 IST

भारतात आजमितीला असणाऱ्या सर्व सैनिकी शाळांपैकी अतिशय उत्तम अशी वास्तू चंद्रपूरमध्ये उभी राहात आहे. भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा म्हणून ही शाळा नावारूपास येईल, अशा शुभेच्छा चंद्रपूरच्या सैनिकी शाळेला लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी दिल्या आहेत. या सैनिकी शाळेचे लोकार्पण १ जून रोजी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठकीत केली.

ठळक मुद्दे१ जूनला लोकार्पण : पंतप्रधान, मुख्यमंत्री उद्घाटनासाठी येणार, कामाला गती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतात आजमितीला असणाऱ्या सर्व सैनिकी शाळांपैकी अतिशय उत्तम अशी वास्तू चंद्रपूरमध्ये उभी राहात आहे. भारतातील सर्वोत्तम सैनिकी शाळा म्हणून ही शाळा नावारूपास येईल, अशा शुभेच्छा चंद्रपूरच्या सैनिकी शाळेला लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांनी दिल्या आहेत. या सैनिकी शाळेचे लोकार्पण १ जून रोजी करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा बैठकीत केली.ना.सुधीर मुनगंटीवार यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' पैकी एक असणारी चंद्रपूर व बल्लारपूर रस्त्यावरील भिवकुंड जवळील हिरव्या गार विस्तीर्ण अशा १२३ एकरामधील सैनिकी शाळेची वास्तू पूर्णत्वास येत आहे. चार हजार कामगार अहोरात्र या ठिकाणी काम करीत असून विक्रमीवेळेत सैनिकीशाळा पूर्ण केली जाणार आहे. सध्या या ठिकाणच्या पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. तर दुसरा व तिसरा टप्पा पूर्णत्वाकडे येत आहे. भारतात अस्तित्वात असणाºया सर्व सैनिकी शाळांपैकी सर्वात अद्यावत अशी, ही इमारत व्हावी, यासाठी ते प्रयत्नरत होते. आज या शाळेच्या संदर्भातील प्रवेश व बांधकामाच्या शेवटच्या टप्प्यातील आवश्यक सूचना देण्यासाठी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर तसेच भारतीय सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि देशातील सैनिकी शाळेचे निरीक्षक अधिकारी रामबाबू आले होते. त्यांच्या उपस्थितीत या शाळेच्या संबंधित प्रमुख अधिकारी व विकासक यांना संबोधित करताना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी १ जून रोजी या सैनिकी शाळेचे लोकार्पण होईल, अशी घोषणा केली.या शाळेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी प्रधानमंत्री, मुख्यमंत्री यांनादेखील निमंत्रण देण्याचे निर्देश पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. १ जून रोजी मान्यवरांच्या हस्ते या शाळेचे लोकार्पण आता निश्चित झाले आहे.या सैनिकी शाळेच्या कॅम्पसची दर्शनी भिंत ही चंद्रपूरच्या किल्ल्याप्रमाणे तयार करण्यात आली आहे. या ठिकाणी तयार होणारे मैदान हे आॅलिम्पिक दर्जाचे आहे. एक हजार क्षमतेचे प्रेक्षागृह, आधुनिक स्विमिंग टँकपासून तर सर्व सुविधा या भारतीय सैन्यदलाच्या मानांकनाप्रमाणे असणार आहेत.सैनिकी प्रशिक्षणामध्ये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या घोडसवारीच्या संदर्भातही ट्रॅक तयार करण्यात आले असून सैन्यदलाच्या शिफारशीनुसार या ठिकाणी घोडेदेखील पुरविले जाणार आहे. या ठिकाणी मुलांसाठी अद्यावत वसतीगृह व खानपानाच्या सुविधा असतील. या सैनिकी शाळेच्या बाहेरील भागात नर्सरी ते पाचवीपर्यतची शाळादेखील उभी करण्यात आली आहे. या ठिकाणी काम करणारे कर्मचारी यांच्या पाल्यांसाठी व आजूबाजूच्या परिसरातील गावांतील मुलांसाठीही शाळा चालू राहील.चाचणी परीक्षेनंतर प्रवेशया सैनिकी शाळेमध्ये ६ वी व ९ वी इयत्तेनंतर चाचणी परीक्षा दिल्यानंतर प्रवेश मिळणार आहे. या सत्रातील प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून यासंदर्भात वृत्तपत्रांमध्ये लवकरच जाहिरात दिली जाईल. या सैनिकी शाळेमध्ये भारतातील अद्यावत असे सैनिकी संग्रहालयदेखील उभे राहणार आहे. विशाखापट्टणम, अमृतसर, महु या ठिकाणी असलेल्या सैनिकी संग्रहालयापेक्षा अधिक उत्तम हे संग्रहालय तयार होणार आहे.पर्यटकांसाठी पर्वणीताडोबामध्ये पर्यटनाला येणाºया नागरिकांसाठी या शाळेला भेट देणे एक पर्वणी ठरणार असून विशेष कार्यक्रमाच्या आयोजनाची संकल्पना ठेवण्यात आली आहे. पर्यटकांना सैनिकी शाळेच्या दर्शनी भागांमध्ये भेट देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी तयार होणाऱ्या निरीक्षण कक्षातून या संपूर्ण शाळेचे कॅम्पस बघता येणार आहे. पर्यटकांना दर्शनी भागांमध्ये देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाºया शहीद विरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी पुतळेदेखील उभे राहत आहेत. या ठिकाणच्या सभागृहामध्ये कारगिल युद्ध, भारताचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे जीवनचरित्र व नौदलाच्या थरारक प्रात्यक्षिकाचे थ्री डायमेन्शन माहितीपट दाखविण्यात येणार आहे. रणगाडे, विमान, हेलिकॉप्टर या सर्व लढाऊ वस्तू याठिकाणी दर्शनी ठेवण्यात येणार आहे.