लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत ब्रह्मपुरी, नागभीड, मुल व सावली या चार तालुक्यात सुरू असलेली सर्व कामे मुदतीत पूर्ण करून शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत सिंचनाचा लाभ द्या, अशा स्पष्ट सूचना मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.ब्रह्मपुरी येथे गोसीखुर्द विश्रामगृहात गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या वितरण प्रणालीच्या कामांचा आढावा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते.अधिकारी, कंत्राटदार तसेच लाभ क्षेत्रातील लाभधारक यांच्यामध्ये समन्वयाची भूमिका बजावून कामे पूर्ण करावी. कामाचा दर्जा उत्तम असला पाहिजे. तसेच ही कामे करीत असताना अडचणी येणार नाही, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्यात.यावेळी, ब्रह्मपुरीचे कार्यकारी अभियंता सातपुते, मुल व सावलीचे कार्यकारी अभियंता सोनवणे, नागभिडचे कार्यकारी अभियंता फाळके तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, गोसीखुर्दचे पाणी मिळेल आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, अशी आशा तालुक्यातील शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे स्वपपूर्ण करण्याची जबाबदारी आहे. असेही यावेळी त्यांनी सांगितले. दरम्यान, काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवून काम पूर्ण करा, असेही पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांनी बजावले.शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण कराचारही तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न दाखवतो आहोत. त्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी वितरण प्रणाली अंतर्गत कालवे आणि बंद नलिकेची कामे त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी कामासंदर्भात येणाऱ्या विविध अडचणी विषयीची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.
गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत सुरू कामे मुदतीत पूर्ण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 05:00 IST
चारही तालुक्यातील शेतकऱ्यांना अनेक वर्षांपासून शेतीच्या सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याचे स्वप्न दाखवतो आहोत. त्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देऊन त्यांची आर्थिक उन्नती साधण्यासाठी वितरण प्रणाली अंतर्गत कालवे आणि बंद नलिकेची कामे त्वरित पूर्ण करणे आवश्यक आहे. यासाठी कामासंदर्भात येणाऱ्या विविध अडचणी विषयीची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली.
गोसेखुर्द प्रकल्पांतर्गत सुरू कामे मुदतीत पूर्ण करा
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : प्रकल्पाअंतर्गत कामांचा घेतला आढावा