चंद्रपूर : यंग चांदा ब्रिगेडच्या बालाजी वार्ड शाखेच्या वतीने टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविण्याच्या स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत २१ हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी शहर संघटीका वंदना हातगावकर, साहिली येरणे, अल्पसंख्याक महिला आघाडीच्या शहर संघटीका कौसर खान, भाग्यश्री हांडे, विमल काटकर, संतोषी चौव्हाण, आशू फुलझेले, वैशाली मेश्राम, स्मीता रेभणकर उपस्थित होती. संतोष बाजाईत यांना प्रथम पुरस्कार, निता भय्या दुसरा व निता तंगडपल्लीवार यांना तृतीय पुरस्कार मिळाला. विजयी स्पर्धकांना आ. जोरगेवार यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. धनश्री आंबेकर व सुंनदा वडारकर यंनी परिक्षक म्हणून काम पाहिले. प्रास्ताविक वंदना हातगावकर, संचालन वैशाली मद्दीवार यांनी केले.
टाकाऊ वस्तूपासुन टिकाऊ वस्तु बनविण्याची स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST