शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारासाठी औद्योगिक विकास करून ब्रह्मपूरी जिल्हा निर्मितीसाठी कटिबध्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 14:41 IST

विजय वडेट्टीवार : ब्रह्मपूरी येथे प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क ब्रह्मपुरी : गेल्या दहा वर्षांपासून ब्रह्मपूरी मतदारसंघातील जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून येथील लोकप्रतिनिधीत्वाची सूत्रे हाती दिली. या आशीर्वादाने मिळालेल्या बळाच्या जोरावर जनमताच्या विश्वासाला तडा न जाऊ देता कोट्यवधींचा विकास निधी खेचून आणून मतदारसंघाचा विकास केला.

भविष्यात येथे औद्योगिकरणातून प्रगती साधून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार तसेच विकसित ब्रह्मपुरीला जिल्हा बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, अशी ग्वाही महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिली. ब्रह्मपूरी विधानसभा निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी झालेली विकासकामे सांगून ब्रह्मपुरी विधानसभा मतदार संघाचे व्हिजनही त्यांनी स्पष्ट केले.

उद्घाटनाप्रसंगी प्रामुख्याने विमुक्त जाती भटक्या जमाती सेल प्रदेशाध्यक्ष पल्लवी रेनके, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. देवीदास जगनाडे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते दामोधर मिसार, अॅड. मनोहर उरकुडे, कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद झोडगे, काँग्रेस ओबीसी सेलचे राष्ट्रीय समन्वयक अॅड. गोविंद भेंडारकर, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी नगराध्यक्षा वनिता ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष वासु सोंदरकर, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प. सदस्य डॉ. राजेश कांबळे, रिपाइं गवई गटाचे नेते विजय रामटेके, एकलव्य सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद भन्नारे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष इक्बाल जेसानी, इनायत पठाण, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा काँग्रेस सचिव विलास विखार, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष मोंटु पिलारे, योगेश मिसार यांसह महाविकास आघाडी व घटक पक्षातील सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारchandrapur-acचंद्रपूर