शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
3
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
4
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
5
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
6
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
7
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
8
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
9
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
10
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
11
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
12
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
13
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
14
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
15
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
16
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
17
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
18
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
19
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
20
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण

प्रकल्पग्रस्त शेतकºयांना न्याय देण्यास कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 11:39 PM

वेकोलिच्या विविध प्रकल्पांसाठी शेतकºयांची जमिनी बळजबरीने घेणे अन्यायकारक असून भूमीअधिग्रहण कायद्यानुसारच प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे, ....

ठळक मुद्देहंसराज अहीर : दिल्लीतील बैठकीत ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: वेकोलिच्या विविध प्रकल्पांसाठी शेतकºयांची जमिनी बळजबरीने घेणे अन्यायकारक असून भूमीअधिग्रहण कायद्यानुसारच प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास केंद्र सरकार कटिबद्ध आहे, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली़वेकोलिच्या विविध प्रकल्पांसाठी जमिनीचा दर व नोकरी संदर्भात दिल्ली येथे केंद्रीय कोळसा मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत पार पडलेल्या संयुक्त बैठकीत दिली़ना़ अहीर म्हणाले, वेकोलिमधील चालू आणि भविष्यात होणाºया प्रकल्पांमध्ये सी. बी. अ‍ॅक्ट १९५७ मधील कलम १४ (१) चा वापर करुन सर्व शेतकºयांना एकरी ८ ते १० लाख रुपये मोबदला देण्यात येणार आहे़ सीआयएलआर अ‍ॅण्ड आर पॉलिसी २०१२ प्रमाणे नोकºया दिल्या जातील वेकोलीच्या सात प्रकल्पांना याचा मोठा फायदा होणार आहे़ यामध्ये बल्लारपूर क्षेत्रातील पोवनी- ३, धोपटाळा विस्तारित चिंचोली तसेच वणी क्षेत्रातील बेल्लोरा नायगाव निलजई, मुंगोली एक्सटेंशन व वणी नॉर्थ क्षेत्रातील उकनी प्रकल्पांचा समावेश आहे़ कोल बेअरींग अ‍ॅक्ट १९५७ मध्ये जमिनीचे दर ठरविण्याच्या पद्धतीत १३ (५) व १४ (१) या दोन्ही कलमांची तरतुद आहे़ राज्य शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे करारनामा करुन मागील वर्षी एकरी ८ ते १० लाख रुपये दर दिला़ हा १४ (१) कलमाचाच उपयोेग करुन वेकोलिच्या १९ प्रकल्पामध्ये १५०० कोटींच्या वर रक्कम आणि ५ हजारांपेक्षा अधिक नोकºया दिल्या होत्या़, असेही ना़ अहीर म्हणाले़ शेतकरी व कंपनी यांच्यातील करारनामा हा कायद्यानुसार असल्यामुळे यापुढेही जमिनीचे दर द्यावे़ तसेच वेकोलिमध्ये भूमी अधिग्रहन नसताना व कोल बेअरींग अ‍ॅक्टमध्ये १४ (१) कलमचा कायद्याने उपयोग केला जात असताना वेकोली अधिकाºयांनी प्रकल्पग्रस्तांना अनावश्यक त्रास दिला, याकडेही त्यांनी दिल्ली येथील बैठकीत लक्ष वेधले़ ज्यांच्या भूमितून कोळसा निघणार त्यांना मानसिक त्रास देणे, अन्यायकारक आहे, अशी भूमिका ना. अहीर यांनी कोळसा मंत्र्यांकडे मांडली़वेकोलिच्या अधिकाºयांनी सी.बी. एक्ट १९५७ मधील १४ (१) कलमाचा केंद्राच्या नोटीफिकेशनमध्ये कुठेही उल्लेख नाही़ या कायद्यातील १३ (५) कलम कालबाह्य झाले असताना विनाकारण शेतकºयांची दिशाभूल करून राष्टÑीय उत्पन्नाचे नुकसान केले. केंद्रीय कोळसा मंत्री पियुष गोयल यांनी सीबी अ‍ॅक्टमधील १४ (१) कलमाचा वापर करून शेतकºयांना एकरी ८ ते १० लाख रुपये दर देऊ़ शिवाय, प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या मर्जीनेच काम करण्याचे निर्देश दिले़ कोळसा मंत्र्यांनी वेकोली अधिकाºयांच्या भूमिकेवरही नाराजी नाराजी व्यक्त केली़ कुठल्याही प्रकल्पाचा आर्थिक मोबदला देण्यासाठी विलंब करू नये़ त्यासंदर्भातील सर्व अहवाल तातडीने मंत्रालयात पाठवावे़, अशी सूचना केंद्रीय कोळसा मंत्री पियुष गोयल यांना दिले़ शेतकºयांवर अन्याय होऊ नये, यासाठी वेकोलिने नियमांची अंमलबजावणी करावी़ अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही या बैठकीत देण्यात आला़ केंद्रीय मंत्र्यांच्या या भूमिकेबद्दल जिल्ह्यातील शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे़ बैठकीला कोळसा मंत्रालयाचे मुख्य सचिव सुशिल कुमार तसेच भाजपाचे जिल्हा महामंत्री राहुल सराफ उपस्थित होते़