विना मास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:16 IST2021-02-19T04:16:54+5:302021-02-19T04:16:54+5:30

मूल : कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत मिळू लागल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी नगर परिषद ...

Collection of fines from those without masks | विना मास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल

विना मास्क फिरणाऱ्यांकडून दंड वसूल

मूल : कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत मिळू लागल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी नगर परिषद मूल व पोलीस प्रशासन यांनी संयुक्त मोहीम राबवून विना मास्क फिरणाऱ्यांवर ५०० रुपये दंडाची कारवाई सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी सात व्यक्तींवर कारवाई करून ३५०० रुपये दंड वसूल करण्यात आला.

नगर परिषद मूलचे मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, पोलीस स्टेशन मूलचे पोलीस निरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाईची मोहीम सुरू केली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता जनतेने आवश्यक असतानाच घराबाहेर निघावे. मास्कचा वापर करावा. वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करून कुटुंबातील कुणीही बाधित होणार नाही, याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Collection of fines from those without masks