सचिन सरपटवार ।आॅनलाईन लोकमतभद्रावती : स्वच्छतेचा दूत असलेल्या कचरा वेचणाऱ्या रामलू गटावारच्या ‘लोकमत’मधील बातमीसह त्याचे छायाचित्र भद्रावती शहरात डौलाने झळकत आहे. पुजेचे सामान विकणाऱ्यापासून तर अंत्ययात्रेचे सामान विकणारे सर्व स्तरावरीत नागरिक विविध फलकांद्वारे स्वच्छतेचा संदेश देत आहेत. प्रत्येकाच्या मुखात एकच टॅग लाईन दिसत आहे. ती म्हणजे माझे शहर... स्वच्छतेचे माहेरघर, मला अभिमान मी भद्रावतीकर. भद्रावती शहरात नगर परिषदेच्या माध्यमातून लावण्यात आलेली ही ३०० फलके अत्यंत बोलकी असून त्यातून प्रत्येकजण स्वच्छतेचा संदेश देत आहेत. हे फलक भद्रावतीवासीयांसाठी एक आकर्षण ठरले असून मांडव सजला आहे. लग्नाची घटीका जवळ येत आहे, असे चित्र दिसत आहे.सध्या स्वच्छता विषय सोडून एकही फलक भद्रावती शहरात दिसून येत नाही. वाढदिवस, शुभेच्छा, राजकीय जाहीरातीचे फलक नाहीसे झाले आहेत. कामगार, नोकरदार, व्यापारी, व्यावसायीक मजूर, समाजसेवी यांना या स्वच्छतेच्या फलकांसाठी निवडण्यात आले आहे. सर्वमान्यांचा सहभाग यातून दर्शविल्या जात आहे. काही दुकानदारांनी शहराचे विदु्रपिकरण होवू नये म्हणून स्वत: दुकानाच्या बाहेर लटकविलेल्या पाट्या काढल्या आहेत. शहराच्या प्रवेशद्वारापासून तर रेल्वेस्टेशन पर्यंत, चंद्रपूर-नागपूर महामार्गावर, भद्रनाग मंदिरापासून देऊळवाडा रोड पर्यंत स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावण्यात आले आहेत.स्वच्छतेचे ब्रँड अॅम्बॅसेसिडर अमिताभ बच्चन, सुरेश रैना, शिल्पा शेट्टी यांचेही फलक विविध ठिकाणी दिसत आहेत. सार्वजनिक शौचालये, गृहनिर्माण संस्था, बगीचे सजले आहे. वैयक्तीक व सांधिक छायाचित्र घेण्यात आले आहे. सर्व जाहीरात एजन्सीनी यात स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला आहे. स्वच्छतेच्या प्रचार व प्रसारासाठी ही मोहीम हाती घेतल्याचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले.सार्वजनिक शौचालयावर लागल्या फिडबॅक मशीनसार्वजनिक शौचालयावर फिडबॅक (व्होटींग) साठी मशिन लावण्यात आल्या आहेत. शौचालयावर हिरवा, पिवळा, लाल रंगाच्या तीन बटन असलेला बोर्ड लावण्यात आला आहे. हिरवा रंग म्हणजे चांगले, पिवळा म्हणजे सर्वसाधारण व खराब म्हणजे लाल अशाप्रकारे फिडबॅक घेतला जात आहे. यामुळे शौचालयाने मुल्यमापन जनतेच्या हाती आले आहे.घंटागाडीवर लागल्या जीपीएस मशिनघंटागाडीचा लोकेशन जनतेला माहित होण्यासाठी घंटागाडी धारकाच्या गळ्यात मॉनिटर देण्यात आले आहे. घंटागाडीवर जीपीएस मशिन लावण्यात आली असून यावरुन घंटागाडी नेमकी कुठे आहे, याची माहिती मिळते.वॉर्डावॉर्डात खतनिर्मितीवॉर्डावॉर्डात विकेंद्रीत पद्धतीने खत निर्मिती होत आहे. दहा नगरपालिकांनी कामाच्या पाहणीसाठी तसेच इतरही विकासात्मक कामे पाहण्यासाठी येथे भेटी देऊन गेल्या आहेत. स्वच्छतेची पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथक येथे आले आहे.
फलक देताहेत स्वच्छतेचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 22:47 IST
स्वच्छतेचा दूत असलेल्या कचरा वेचणाऱ्या रामलू गटावारच्या ‘लोकमत’मधील बातमीसह त्याचे छायाचित्र भद्रावती शहरात डौलाने झळकत आहे.
फलक देताहेत स्वच्छतेचा संदेश
ठळक मुद्दे‘मला अभिमान मी भद्रावतीकर’ची टॅगलाईन : लोकमतच्या बातमीसह रामलूचे फलक आकर्षण