चंद्रपूर : दहावी सीबीएसएसीचा निकाल आज गुरूवारी दुपारी १२ वाजता आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. ब्रह्मपुरी येथील विद्या निकेतन हायस्कूलमधील तेजश्री नागदेवते, प्रथमेश दहीकर, पायल अग्रवाल, इशा पटेल या चार विद्यार्थ्यांनी व चंद्रपूर येथील बीजीएम कारर्मेल अकादमीची विद्यार्थिनी श्रृती बजाज हिने ९५ टक्के गुण घेत गुणवंत ठरले. चंद्रपूर येथील माऊंट कॉन्व्हेंटचा विद्यार्थी योगेश नवीन चोरडिया व ब्रह्मपुरी येथील विद्या निकेतन हायस्कूलच्या निधी जेजाणी, दीक्षा सादवानी या विद्यार्थ्यांनी ९४ टक्के गुण घेतले. राजुरा येथील इनफंट जेसीस इंग्लीश पब्लीक हायस्कूल, विद्या निकेतन स्कूल ब्रह्मपुरीचा निकाल १०० टक्के लागला आहे. भद्रावती येथील फेअरीलॅन्ड हायस्कूलचाही निकाल १०० टक्के लागला असून प्रतिक रायपूरे याने ८३.६०, साची पारेकट हिने ८१.७० व निशीगंधा उमाटे हिने ७६ टक्के गुण घेत गुणवंत ठरले. ब्रह्मपुरी येथील विद्या निकेतन स्कूलचे विराग पणपालिया, सैनकसिंग लालसिंग खालसा यांनी ९२ टक्के तर श्रृती माणिक पिलारे हिने ९० टक्के गुण घेतले. चंद्रपुरातील श्री महर्षी महर्षी विद्यामंदिर विद्यालयाने निकालाची परंपरा कायम ठेवत १०० टक्के निकाल दिला. चंद्रपुरातील चांदा पब्लीक स्कूलनेही १०० टक्के निकाल दिला असून या विद्यालयातील अंजली ठावरी, अंकीत सिन्हा, उत्सव भोरसरे, नमस्वी मल्हा, मेघना रेड्डी यांनी ९५ टक्के गुण घेत गुणवंत ठरले. तर विरेश मोहुर्ले, आसावरी निनावे, नयन थुलकर, कौशल सातोने, हिमांशु काटकर, वैष्णवी सारडा यांनी ९३ टक्के गुण घेतले. तसेच अदीती झाडे, धृव राईस, वरून अडेवार, विजयालक्ष्मी खत्री, संकेत धवस, झीनत सय्यद यांनी ९१.२० टक्के गुण घेतले. प्रक्षीक भगत, वैष्णवी भोजक, रिधी बच्चुवार, प्रथमेश खोब्रागडे, दिनेश मोदी यांनी ८९.३० टक्के गुण घेतले. पियुश राऊत, प्रतीक चौधरी, जुबेर लाखणी, निशी चरडे, अनुश्री इंगोले, कोमल बुरांडे यांनी ८७.४० टक्के गुण घेतले. प्रणय टाक, आश्लेषा कथले, अंकुश वानखेडे, रूषीकेश गिरीपुंजे व पुजा निशामदार हिने ८५.५० टक्के गुण घेतले.बल्लारपूर तालुक्यातील बामनी मोनफोर्ट सेकंडरी हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. जिल्ह्यामध्ये सीबीएसी पॅटर्न शाळांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. असे असले तरी दहावीपेक्षा बारावीपर्यंत असलेल्या विद्यालयांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. सीबीएससी शाळांचा यंदा बारावीचा लागलेला निकाल उंचावला असल्यामुळे पालकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. भविष्यात मोठी स्पर्धा निर्माण होण्याची चिन्ह आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)
दहावी सीबीएससीचा निकाल १०० टक्के
By admin | Updated: May 29, 2015 01:35 IST