शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

किमान वेतनासाठी सीटू, आयटक कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 22:40 IST

शासनाच्या विविध योजना प्रत्यक्षात राबविणाऱ्या अंगणवाडी महिला, आशा व गटप्रवर्तक तसेच शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिला व इतर योजना कर्मचाऱ्यांची संख्या देशात एक कोटींपेक्षा जास्त आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेवर धडक : असंख्य अंगणवाडी सेविकांचा सहभाग

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शासनाच्या विविध योजना प्रत्यक्षात राबविणाऱ्या अंगणवाडी महिला, आशा व गटप्रवर्तक तसेच शालेय पोषण आहार बनविणाऱ्या महिला व इतर योजना कर्मचाऱ्यांची संख्या देशात एक कोटींपेक्षा जास्त आहे. काहींना मानधन तर काहींना कामाचा मोबदला दिल्या जातो. मात्र किमान वेतन कोणालाही दिल्या जात नाही. या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्यावे, या मागणीसाठी बुधवारी सीटू, आयटक सलंग्न अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून केंद्र शासनाला निवेदन पाठविले.केंद्र शासनाने कामगार विषयक धोरण ठरविण्याच्या उद्देशाने ४५ वे श्रमसंमेलन आयोजित केले होते. या संमेलनात तीन महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आले. योजना कर्मचारी स्वयंसेवक नाही तर ते कामगार आहेत. त्यांना देखील किमान वेतन दिले पाहिजे. तसेच सामाजिक सुरक्षा प्राव्हडंट फंड व पेंशन लागू करण्यात यावी, असे तीन ठराव तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या उपस्थितीत मंजूर करण्यात आले.मात्र चार वर्ष लोटूनही त्या ठरावाची अंमलबजावणी मोदी सरकारने केली नाही. त्या ठरावाची अंमलबजावणी करून किमान वेतनाच्या मागणीसाठी देशातील विविध संघटनांच्या वतीने १७ जानेवारीला देशव्यापी संप पुकारण्यात आला. या निमित्ताने चंद्रपुरातही मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात असंख्य योजना कर्मचारी सहभागी झाले होते.योजना कर्मचाऱ्यांना कामगार म्हणून घोषित करा, योजना कर्मचाऱ्यांना कामगारांचा दर्जा द्या, किमान वेतन १८ हजार रुपये मिळालेच पाहिजे, प्राव्हडंट फंड तथा पेंशन लागू करा, अशा घोषणा देत मोर्चा जिल्हा परिषदेवर धडकला व मागण्यांचे निवेदन मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान मोदी यांना पाठविण्यात आले.या मोर्चाचे नेतृत्व आयटकचे विनोद झोडगे, दिलीप बर्वी, सीटूचे प्रा. रमेशचंद्र दहीवडे, संतोष दास, भाकपाचे प्रा. नामदेव कन्नाके, वामन बुटले, शोभा बोगावार यांनी केले. मोर्चात वंदना मुळे, प्रणिता लांडगे, वंदना जिवणे, संध्या खनके, पवित्रा ताकसांडे, ललीता चौधरी, वैशाली बोकारे, प्रमोद गोरघाटे यांच्यासह जिल्हाभरातील अंगणवाडी सेविकांचा सहभाग होता.