गेवरा : चिमूर-गडचिरोली व गडचिरोली चिमूर अशी बसफेरी बारसागड मार्गे सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.चिमूर आगाराची सकाळी १० वाजताची चिमूर ते गडचिरोली बस पाथरी-व्हाया थेट निफंद्रा-व्याहाड गडचिरोलीकडे जाते. ती बस मेहा फाटा चौरस्त्यावरून बारसागड मार्गे निफंद्रा सुरू केल्यास व गडचिरोली आगाराची सकाळी १० वाजता दरम्यान येणारी निफंद्रावरून सरळ पालेबारसाकडे न जाते बारसागड मार्गे सुरू केल्यास येथील प्रवाशांना सोयीचे होणार आहे. काही महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने अशी बस सुरू करण्यात आली होती. गडचिरोली - चिमूर, चिमूर - गडचिरोली बस काही दिवस बारसागडा मार्गे प्रवास करायची. याचा आनंद बारसागडवासीयांना झाला खरा परंतु काही महिन्यातच एसटी महामंडळाने या मार्गे सुरू केलेली बस बंद करून सरळ निफंद्रावरून व्याहाडकडे व पालेबारसा थेट वळविली. परिणामी बारसागडवासीयांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरात वाघ, बिबट, हिस्त्र पशुंचा वावर असून या दहशतीखाली जीवन जगावे लागते. तालुक्याला, जिल्ह्याला तथा इतर कामांकरिता निफंद्रा बसथांब्याकडे जंगल परिसरातून पायपीट करावी लागत आहे. (वार्ताहर)
चिमूर-गडचिरोली बसफेरी बारसागड मार्गे सुरू करा
By admin | Updated: May 22, 2015 01:27 IST