शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

रसायनयुक्त पाण्याने शेकडो मासोळ्यांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2021 05:00 IST

कोलारी येथे सीऑन ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर  लिमिटेड  ही सोयाबीन तेल बनविणारी कंपनी आहे. कोलारी ते मेंढेगाव या रस्त्यावर कंपनीस्थित असून या कंपनीच्या बाजूला कोलारी नदी वाहते. या नदीमध्ये या कंपनीचे रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे हजारो मासोळ्यांचा व इतर जलचर प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे. तसेच चार शेतकऱ्यांची शेती बाधित झालेली आहे. या कोलारी नदीवर दोन कंपन्या स्थित असून या कंपन्यांचे पाणी या नदीला सोडण्यात येते.

अमोद गौरकरलोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : येथून जवळच असलेल्या कोलारी येथील नदीमध्ये कंपनीने रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे हजारो मासोळ्यांचा तथा जलचर प्राण्यांचा मृत्यू झाला. तसेच चार शेतकऱ्यांची धानशेती बाधित झालेली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र याची तक्रार घेण्यास चिमूर तालुक्यातील एकही अधिकारी तयार नाही. त्यामुळे शेतकरी हतबल बनले आहेत.             कोलारी येथे सीऑन ॲग्रो इंडस्ट्रीज अँड इन्फ्रास्ट्रक्चर  लिमिटेड  ही सोयाबीन तेल बनविणारी कंपनी आहे. कोलारी ते मेंढेगाव या रस्त्यावर कंपनीस्थित असून या कंपनीच्या बाजूला कोलारी नदी वाहते. या नदीमध्ये या कंपनीचे रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे हजारो मासोळ्यांचा व इतर जलचर प्राण्यांचा मृत्यू झालेला आहे. तसेच चार शेतकऱ्यांची शेती बाधित झालेली आहे. या कोलारी नदीवर दोन कंपन्या स्थित असून या कंपन्यांचे पाणी या नदीला सोडण्यात येते. ही नदी बारमाही असून समोर जाऊन वैनगंगा या मोठ्या नदीला जोडली जाते. सीऑन कंपनीने रसायनयुक्त पाणी सोडल्यामुळे पाणी प्रदूषित झालेले असून संपूर्ण नदीचे पाणी हे पांढरे झालेले आहे. तसेच या पाण्यावर रसायनयुक्त साय तरंगताना दिसत आहे. 

पिकांचे सिंचन कसे करणार?या नदीवर शेकडो शेतकरी अवलंबून असून या नदीचे पाणी शेतीपिकाला देण्यात येते. परंतु हे रसायनयुक्त पाणी असल्यामुळे आता शेतीपिकालाही  पाणी शेतकरी देऊ शकत नाहीत. यात प्रामुख्याने सागर दिलीप गावंडे, बाबा श्रीकृष्ण गावंडे, दुर्वेश पुंडलिक गावंडे व इतर शेतकऱ्यांच्या धानशेतीत हे रसायनयुक्त पाणी गेल्यामुळे पूर्ण धानपीक नष्ट झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांची हजारो रुपयांची पिके नष्ट झाल्यामुळे ते आर्थिक विवंचनेत आहेत. याबाबत शेतकरी कंपनीकडे तक्रार दाखल करण्यास गेले असता त्यांनी तक्रार घेण्यास नकार दिला. यासोबतच शंकरपूर येथील पोलीस चौकी, चिमूर येथील तहसीलदार यांनीसुद्धा ही तक्रार घेतलेली नाही. याबाबत मात्र कृषी विभागाने तक्रार दाखल करून घेतलेली आहे. 

कंपनीमध्ये जलशुद्धीकरण यंत्र बसविले असून पाणी शुद्ध करूनच प्रथम  आम्ही आमच्या जमिनीवर सोडत असतो आणि त्यानंतर हे पाणी नदीमध्ये जात असते. पाऊस आल्याने  थोडेफार काही  रासायनिक अंश गेले असल्याने मासोळ्यांचा व इतर जलचर प्राण्यांचा मृत्यू झाला असावा. सुधारणा करून शुद्ध पाणी नदीला कसे जाईल, याचा प्रयत्न करणार आहे. - एस. एन. म्हस्के, व्यवस्थापक, सीऑन कंपनी, कोलारी.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प