शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

आकारणी फोर जीची; सेवा मात्र टू जी सारखी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 12:35 IST

Chandrapur : मोबाइलचे नेटवर्क नसल्याने ग्राहकांना मनस्ताप

राजेश बारसागडे लोकमत न्यूज नेटवर्क सावरगाव : रिलायन्स समूहाच्या जिओ नेटवर्कने संपूर्ण देशात जाळे विणले. फोर-जी सेवा दिली आणि कमी पैशात अधिक डेटा मिळत असल्यामुळे ग्राहकांनी जिओची सेवा स्वीकारली. मात्र, मागील काही महिन्यांपासून जिओचे नेटवर्क कमालीचे घसरले आहे. फोरजी सेवा असून टूजी सेवेसारखी स्थिती निर्माण झाली आहे. या असुविधेचा मनस्ताप ग्राहकांना सहन करावा लागत आहे. दरम्यान, जिओ नेटवर्कने ग्राहकांना योग्य सुविधा पुरवावी अशी मागणी जिओ सिमधारकांनी केली आहे.

ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जिओ सिमधारक आहेत. त्यानुसार पूर्वी जिओ नेटवर्कची सुविधासुद्धा बऱ्यापैकी होती. परंतु मागील काही दिवसांपासून टॉवरची क्षमता असूनसुद्धा मोबाइलला योग्य नेटवर्क मिळेनासे झाले आहे. क्षमता कमी आणि वापरकर्ते अधिक असल्याचा फटका ग्राहकांना बसत तर नाही आहे ना! असे ग्राहकांकडून बोलले जात आहे. एकंदर सर्वांकडेच फोरजी सेवेचेच स्मार्ट फोन आहेत. फोर-जी सेवा अस्तित्वात असताना सुद्धा टू-जी सारखी सेवा मिळत असल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. फोन करताना नॉट रिचेबल, नो नेटवर्क, कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर.... असे संदेश येत असल्यामुळे  कमालीचा मनस्ताप नागरिकांना होत आहे. ही समस्या नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) सावरगाव, वाढोणा, किटाळी, ऊश्राळ मेंढा मिंडाळा, बाळापूर, कन्हाळगाव, गिरगांव, आलेवाही आदी परिसरात कित्येक महिन्यांपासून कायम आहे. 

कंपनीने ग्राहकांची समस्या मार्गी लावावी ग्राहकांनी चांगली सेवा मिळावी म्हणून जिओ नेटवर्कला पसंती दिली. अधिक पैसे मोजून रिचार्ज करवून घेतला. अलीकडे पुन्हा कंपनीने रिचार्जचे दर वाढविले आहेत. मात्र त्याप्रमाणे योग्य सेवा मिळत नसल्यामुळे जिओ कंपनीविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे. जिओ कंपनीने ही समस्या मार्गी लावावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरInternetइंटरनेट