शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कर थकबाकीने चंद्रपूरची पाणीपुरवठा योजना कोलमडण्याच्या मार्गावर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 11:47 IST

पाणीकर भरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष : महापालिकेवर आर्थिक भुर्दंड

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : महानगरपालिकेने शहरातील सर्व नळजोडणीवर जलमापक (मीटर) लावले. जानेवारी महिन्यापासून प्रत्यक्ष वापर सुरू आहे. मात्र घरपोच पाणी मिळत असूनही नागरिक पाणीकर भरण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे थकबाकी वाढली. नागरिकांनी मनपाला सहकार्य केले नाही तर ही योजना कोलमडून अन्य सोई- सुविधांवरही अनिष्ट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चंद्रपूरला इरई नदी व धरणावरून पाण्याची उचल केली जाते. रामनगर व तुकूम येथील जलशुद्धीकरण केंद्रावर प्रक्रिया करून १६ जलकुंभाद्वारे पाणी पुरवठा होतो. शहराची गरज पाहता सध्या ४२ दशलक्ष लीटर पाण्याचे वाटप मनपाद्वारे दररोज सुरू आहे. अमृत योजना सुरू होण्यापूर्वी शहरात ३५ हजार अधिकृत नळ कनेक्शन होते. अमृत योजनेअंतर्गत वाढ होऊन ६२ हजारपर्यंत झाले. काही नळांना पाणी कमी येणे किंवा प्रेशर कमी येत असल्याच्या तक्रारी येत होत्या. तपासणीनंतर, उगाच नळ सुरू ठेवणे, वाहने धुण्यास वापर करणे, अशा निष्काळजीपणाने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसून आले. 

१४ टक्के नळजोडणीधारकांनीच भरला पाणीकर५० हजार ८९१ घरी मनपाद्वारे आतापर्यंत मीटर लावण्यात आले. यापैकी केवळ १४ टक्के नळजोडणी धारकांनीच पाणीकराचा भरणा केला. त्यामुळे प्रामाणिकपणे करभरणा करणाऱ्या नागरिकांचे नुकसान होत आहे. अप्राप्त देयकांमुळे संपूर्ण पाणी पुरवठा योजना तोट्यात जाण्याची शक्यता आहे. काही नागरिकांचे देयक हे शून्य रुपये आले. हे तेव्हाच शक्य असते जेव्हा मीटरला लागून असलेला पाइप काढला जातो. ज्यामुळे पाण्याचा वापर करताना मीटर बंद असते. बिल रीडिंग अतिशय कमी येते किंवा शून्य येते. पाणी मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या नागरिकांचा पुरवठा बंद व दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मनपाने दिला आहे. 

नागरिकांच्या आग्रहाखातरच बसविले घरोघरी मीटर

  • सर्वांना आवश्यक ते पाणी मिळावे यासाठी पाण्याचा अपव्यय टाळणे आवश्यक होते. 
  • मीटर लावण्यापूर्वी नळ जोडणीधारकांकडून सरसकट वार्षिक पाणीपट्टी कर घेतला जात होता. तो सर्वांना सारखाच लागू होता. त्यामुळे पाण्याचा किती वापर प्रत्ये- काकडून केला जातो. याचा अंदाज बांधणे कठीण होते. 
  • अखेर नागरिकांच्या आग्रहाखातर 'पाण्याचा जेवढा वापर तेवढेच देयक' या सूत्रानुसार मनपाकडून घरोघरी मीटर बसविण्यात आले.

"पाणी कराची थकबाकी वाढली. त्यामुळे पाणी पुरवठ्याचा खर्च मालमत्ता कर व इतर उत्पन्नातून भागवावा लागतो. नागरिकांनी पाणी कर भरला नाही तर कराच्या बदल्यात दिल्या जाणाऱ्या अन्य सुविधांवर वाईट परिणाम होऊ शकतो. थकबाकी वाढतच राहिली तर ही योजना चालविणे शक्य होणार नाही. त्यामुळे नळजोडणीधारकांनी पाणीकर प्रामाणिकपणे भरावा. कुठे मीटर बंद करून पाणी वापर होत असेल तर तसे मनपाला कळवावे." -विपीन पालीवाल, आयुक्त मनपा

टॅग्स :water transportजलवाहतूकchandrapur-acचंद्रपूर