शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

चंद्रपूरकरांना हवा आमुलाग्र विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 5:00 AM

कुठे प्रगती झाली तर कुठे समस्यांची गुंतागुंत वाढतच आहे. या आव्हानांवर मात करून शहराचा चेहरमोहरा बदलायचा असेल; तर दीर्घकालीन व आमुलाग्र विकासाचे नियोजन करणे गरज असल्याचा सूर शनिवारी नागरिकांनी व्यक्त केला. निमित्त होते चंद्र्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या खुल्या चर्चेचे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहराला ८०० वर्षांचा इतिहास आहे. हे शहर आता खूप बदलले. कुठे प्रगती झाली तर कुठे समस्यांची गुंतागुंत वाढतच आहे. या आव्हानांवर मात करून शहराचा चेहरमोहरा बदलायचा असेल; तर दीर्घकालीन व आमुलाग्र विकासाचे नियोजन करणे गरज असल्याचा सूर शनिवारी नागरिकांनी व्यक्त केला. निमित्त होते चंद्र्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात आयोजित केलेल्या खुल्या चर्चेचे. मंचावर खासदार बाळू धानोकर, शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व आयोजक  रामू तिवारी, पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे, इको प्रोचे बंडू धोतरे, प्रा. श्याम हेडाऊ व  अन्य उपस्थित होते.  

अतिक्रमणाकडे वेधले लक्ष- शुद्ध पाण्याचा शहराचा इतिहास आहे. मात्र, आज पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. युरोपातील नद्या बघण्यासाठी नागरिक जातात. मात्र, अजूनही येथील नद्यांचे शुद्धीकरण झाले नाही. रामाळा तलावाचे संवर्धन व्हावे, अतिक्रमण हटवावे व त्यावर उपाययोजना शोधावी. सोलरला प्राधान्य देत सायकल सीटीसाठी पुढाकार घ्यावा, याकडे प्रा. डाॅ. योगेश दुधपचारे यांनी लक्ष वेधले. 

सर्व राजकीय पक्षांनी तयार करावा अजेंडा प्रत्येक प्रभागात आरोग्य केंद्र सुरु करावे, अग्निशमन वाहने जाण्याएवढे रस्ते तयार करावे, आदी सूचना बंडू धोतरे यांनी केल्या. मकसूद शेख यांनी वडगाव व तुकूम प्रभागात स्मशानभूमीची मागणी केली. प्रा. श्याम हेडाऊ यांनी सर्व राजकीय पक्षांनी शहराचा पंचवार्षिक आराखडा तयार करावा, असे आवाहन केले.

यांनी मांडले विकासाचे व्हिजन...चंद्रपूरच्या विकासासाठी नियोजन कसे असावे, याबाबत  भाविक येरगुडे, विजय खनके, शैलेश जुमडे, मनोहर रामटेके, प्रमोद बोरीकर, दामोदर सारडा, वनश्री मेश्राम, राकेश मार्कंडेवार, अजय दुबे, मकसूद खान, सुनीता अग्रवाल, अलका मोटघरे, निमेश मानकर आदींनी व्हिजन मांडले. 

काय व्हायला पाहिजे ? - पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन झाले नाही. वाहतूक समस्या दूर करावी, मिनी बससेवा, किल्ल्यांभोवती रिंगरोड, विविध ठिकाणी बाजाराची सुविधा, वृक्षलागवड, भूमिगत वीज वाहिनी व वास्तू संग्रहालयाची आवश्यकता आहे. सर्वांनी एकत्रित आल्यास स्थिती बदलेल, असा विश्वास प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :congressकाँग्रेस