लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील नागरिकांना पारपत्र (पासपोर्ट) सेवा सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी टपाल खात्याअंतर्गत पासपोर्ट सेवा केंद्र शहरात सुरू करण्यास मंजुरी दिली. पुढील कार्यवाही करण्यासाठी शुक्रवारी नागपुर पासपोर्ट सेवा केंद्राचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी सी.एल. गौतम व सहकाऱ्यांनी शहराला भेट देवून पासपोर्ट सेवेस अनुकूल व्यवस्थेचा आढावा घेतला.निरीक्षण दौºयाप्रसंगी सी.एल. गौतम यांनी चंद्रपुरातील पासपोर्ट सेवा केंद्रासाठी लागणाºया पायाभूत सुविधांची पुर्तता तातडीने करण्यासाठी संबंधित अधिकाºयांशी चर्चा केली. याबाबतचा अहवाल केंद्र शासनाकडे तात्काळ सादर करून पारपत्र सेवा लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहीती गौतम व सहकारी अधिकारी श्रीकुमार यांनी दिली. पायाभूत सुविधांच्या उपलब्धतेसोबतच पासपोर्ट सेवा सुविधा उपकरणे स्थापित करण्याची कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी याभेटीप्रसंगी नमूद केले. नागपूर विभाग पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातून पासपोर्टविषयक प्रकरणे मोठ्या प्रमाणात येतात.त्यामुळे ही सेवा जिल्ह्यासाठी अत्यावश्यक होती. केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर यांनी सेवा सुरू करण्यासाठी घेतलेला पुढाकार लोकाभिमुख प्रयत्नांचा भाग असुन यामुळे नागरिकांना न्याय मिळणार असल्याची भावना प्रादेशिक पासपोर्ट अधिकाºयांनी व्यक्त केली. भेटीप्रसंगी त्यांनी कार्यालयाचीही पाहणी केली.याप्रसंगी महानगराचे उपमहापौर अनिल फुलझेले, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, चंद्रपूर टपाल खात्याचे अधीक्षक पी. आर. सोनावणे, प्रवर डाकपाल ए.के. बगमारे आदी उपस्थित होते.
आता चंद्रपुरातच मिळणार पारपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 22:50 IST
जिल्ह्यातील नागरिकांना पारपत्र (पासपोर्ट) सेवा सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी टपाल खात्याअंतर्गत पासपोर्ट सेवा केंद्र शहरात सुरू करण्यास मंजुरी दिली. पुढील कार्यवाही करण्यासाठी शुक्रवारी नागपुर पासपोर्ट सेवा केंद्राचे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी सी.एल. गौतम व सहकाऱ्यांनी शहराला भेट देवून पासपोर्ट सेवेस अनुकूल व्यवस्थेचा आढावा घेतला.
आता चंद्रपुरातच मिळणार पारपत्र
ठळक मुद्देकेंद्रीय चमूने केली पाहणी : केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांचे प्रयत्न