शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-कोल्हापुरातील पुरग्रस्तांना चंद्रपुरातून मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:45 IST

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने सर्वत्र मदत पुरविली जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाच्या वतीने दोन ट्रक जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले.

ठळक मुद्देसामाजिक बांधिलकी : विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सांगली व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुराने थैमान घातल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने सर्वत्र मदत पुरविली जात आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन समाजाच्या वतीने दोन ट्रक जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले. १५ आॅगस्टला दोन्ही जिल्ह्यातील आपादग्रस्तांना साहित्य वितरण केल्या जाणार आहे, अशी माहिती माजी खासदार नरेश पुगलिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नागरिकांचे पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. अन्नधान्य, कपडे व घरातील जीवनोपयोगी साहित्य पुरात वाहून गेल्यामुळे उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे राज्यभरातून सर्वत्र मदतीचा ओघ सुरू आहे. विदर्भ किसान मजदूर कांँग्रेसच्या सर्व युनियन तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील जैन समाजाच्या वतीने पाच किलो तांदूळ, पाच किलो आटा, दोन किलो तूर डाळ, १ लिटर तेल, २ किलो साखर, तिखट, मीठ, हळद, जीरे, मेणबत्त्या, माचिस याससह सोलापूरी चादर व एक ब्लँकेट आदी साहित्याच्या ७५० किट्स तयार करण्यात आल्या. हे साहित्य १३ आॅगस्ट २०१९ रोजी रवाना करण्यात आले. दरम्यान, तेथील जिल्हा प्रशासनाच्या वतीने ज्या ठिकाणी हे साहित्य वितरण करण्यासाठी नगरसेवक अशोक नागापुरे व देवेंद्र बेले यांच्यासह कामगार संघटनेचे एक पथक १५ आॅगस्ट २०१९ रोजी साहित्य वितरण करणार आहे, अशी माहिती माजी खासदार पुगलिया यांनी दिली. पत्रकार परिषदेला विदर्भ किसान मजदूर काँग्रेस युनियनचे पदाधिकारी, काँग्रेस व जैन समाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.मदत करण्याचे आवाहनकोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आपाद्ग्रस्त नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येत आहे. विदर्भ किसान मजदूर काँग्रेस आणि जैन सेवा समितीच्या वतीने साहित्य पाठविण्यात आले. जिल्ह्यातील अन्य सामाजिक संस्था व संघटनांनीही मदत करावी, असे आवाहन माजी खासदार नरेश पुगलिया यांनी यावेळी केले.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूर