शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर हिरव्या पाण्याचे प्रकरण; मच्छिमारांना अमलनाला तीरावरून हटण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 12:08 IST

तालुक्यातील माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अमलनाला धरणातील पाणी हिरवे झाल्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. निरीच्या चमूने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

ठळक मुद्देनिरीच्या चमूकडून पाहणी

चंद्रपूर : तालुक्यातील माणिकगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अमलनाला धरणातील पाणी हिरवे झाल्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. निरीच्या चमूने पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. दरम्यान, धरणातील पाणी दूषित होऊ नये, यासाठी तिरावर शेड उभारून बसणाऱ्या मच्छिमारांना तेथून हटविण्याचे आदेश तहसीलदार रवींद्र होळी यांनी दिले आहेत.राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था नागपूरचे मुख्य वैज्ञानिक जी.के. खडसे व चमूने धरणाची प्रत्यक्ष पाहणी केली. धरणाच्या तिरावर मासेमारी करणाऱ्यांनी शेड उभारले असल्याचे चमूच्या लक्षात आले.मासे कापल्यानंतर माश्यांचे आतडे व इतर घाण धरणात टाकण्यात येते. त्यामुळे शेवाळाला पोषण मिळत असून ते झपाट्याने वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. चमूतील सदस्यांच्या सांगण्यावरून राजुराचे तहसीलदार रवींद्र होळी यांनी मासेमाऱ्यांना तेथून हटविण्याचे आदेश दिले आहेत. मासेमाऱ्यांनी इतरत्र शेड उभारण्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही केल्या आहेत. तसेच पुढील आदेशापर्यंत जनावरांना धरणातील पाणी पाजू नये, अशा सूचना तहसीलदारांनी नोकारी (खु.), नोकारी (बु), बैलमपूर, मानोली (खु.) व जामणी येथील ग्रामपंचायतींना दिल्या आहे.पर्यटकांनी खबरदारी घेण्याची गरजधरणाच्या वेस्टवेअरवर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक येतात. धरणाचे पाणी वेस्टवेअरवरून खाली उतरते. त्याला धबधब्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्याचा आनंद उपभोगण्यासाठी पर्यटक पाणी अंगावर घेतात. त्यामुळे त्वचारोग होऊ शकतो. म्हणून पर्यटकांनी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषण