शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्याला पूराचा वेढा; वर्धा, वैनगंगा व पैनगंगा कोपली, अनेकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 05:00 IST

ब्रह्मपुरी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील लाडजपासून पिंपळगाव, अर्हेर, चिखलगाव, भालेश्वर, हरदोली, चिंचोली, पारडगाव, बेटाळा, बोढेगाव, खरकाडा, (पिंपळगाव), नवेगाव, झीलबोडी, बेलगाव, मांगली, किन्ही, जुगनाळा, रणमोचन या सर्व गावांना पुराचा फटका बसला आहे. गांगलवाडी-आवळगाव - मुडझा - व्याहाड मार्ग बंद झाला आहे. असाच पाऊस राहिला तर लाडज हे गावच पाण्याखाली येऊ शकते.

 लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, शिरना, इरई, उमा या नद्यांना पूर आल्यामुळे अनेक गावे पुराने वेढल्या गेल्या आहेत. जिल्ह्यात दीड हजारांहून अधिक घरांची पडझड झाली आहे. याशिवाय अनेक मार्ग बंद असल्याने ग्रामीण जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दोन दिवसांपासून वर्धा नदीचे पाणी - सतत वाढत असल्यामुळे  बल्लारपूर तालुक्यातील ९ मार्ग बंद झाले आहेत. बामणी-राजुरा मार्गावरील वर्धा नदीचे पाणी पुलावरून बामणीपर्यंत एक किलोमीटर दूर आल्याने निर्भय पेट्रोल पंप बंद करावा लागला आहे. बल्लारपूर पोलिसांनी हा मार्गही वाहतुकीसाठी बंद केला आहे. बल्लारपूर-राजुरा, कोठारी-कवडजई, काटवली-बामणी, विसापूर-नांदगाव पोडे, बल्लारपूर-विसापूर, पळसगाव-कवडजई, हडस्ती- चारवट, चारवट- माना-चंद्रपूर, बल्लारपूरकडून वस्ती विभागाकडे जाणारा गोलपुलिया मार्ग बंद झाला आहे. असे असले तरी काही ठिकाणी पर्यायी मार्ग आहेत. वस्ती विभागात वर्धा नदीवरील गणपती घाट पाण्याखाली आला असून नदीचे पाणी विसापूर रस्त्यापर्यंत आले आहे. बल्लारपूर पोलिसांनी बामणी-राजुरा मार्गावर तसेच अनेक ठिकाणी पोलिसांची चमू तैनात केली आहे. बामणी मार्गावर रस्त्याच्या आजूबाजूला दोन किलोमीटरपर्यंत ट्रकची  रांग लागल्याचे गुरूवारी दिवसभर दिसून आले.

ते ट्रकचालक बोटीने सुखरूप- कोरपना तालुक्यात नदीकाठच्या गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली असून पैनगंगा नदीचे पाणी विरूर (गाडे), भारोसा, सांगोडा, कारवाई, अंतरगाव, वनोजा, कोडशी (खु.), कोडशी (बु.) या गावापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. भोयगाव नदीवरील पाणी भरोसा बसस्थानकापर्यंत पोहोचल्याने जवळपास दहा ते बारा ट्रक त्या ठिकाणी अडकले होते. बोटीच्या माध्यमातून प्रशासनाने चालकांना बुधवारी रात्री बाहेर काढले. ट्रक त्याच ठिकाणी उभे आहेत. पूरामुळे नुकसान झाले.

डोलारा तलावातील अनेक घरे पाण्यात- भद्रावती तालुका तथा शहरांमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून डोलारा तलावातील अनेक घरे पाण्याखाली गेलेली आहे. तसेच पिंडोनी तलाव भरून वाहत आहे. घटनास्थळी पाहणी करण्याकरिता आमदार प्रतिभा धानोरकर तसेच नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी भेटी दिल्या असून संबंधित प्रशासन त्याबाबत कार्य करत आहेत. शिवाजीनगर येथील पिंडोनी तलाव, बिजासन तलाव, हनुमान नगर समशानभूमी परिसर, डोलारा तलाव तसेच गुंजाळा या ठिकाणी आमदार प्रतिभा धानोरकर व अनिल धानोरकर यांनी भेटी दिल्या. अनेक ठिकाणी घरात पाणी घुसले.

टोक येथील १०५ जणांचे केले स्थलांतर- पोंभुर्णा तालुक्यातील दोन नदीच्या मधात वसलेल्या टोक येथील १०५ जणांना प्रशासनाने पूर परिस्थितीचा विचार करता खबरदारी म्हणून स्थलांतर केले असून त्यांची चेक ठाणेवासना येथील जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावे प्रभावित- ब्रह्मपुरी तालुक्यातील शेवटच्या टोकावरील लाडजपासून पिंपळगाव, अर्हेर, चिखलगाव, भालेश्वर, हरदोली, चिंचोली, पारडगाव, बेटाळा, बोढेगाव, खरकाडा, (पिंपळगाव), नवेगाव, झीलबोडी, बेलगाव, मांगली, किन्ही, जुगनाळा, रणमोचन या सर्व गावांना पुराचा फटका बसला आहे. गांगलवाडी-आवळगाव - मुडझा - व्याहाड मार्ग बंद झाला आहे. असाच पाऊस राहिला तर लाडज हे गावच पाण्याखाली येऊ शकते.

राजुरा तालुक्याला पुराचा तडाखा- महाराष्ट्र तेलंगणा सीमेलगत राजुरा तालुक्यातील विरूर, धानोरा कविटपेठ, सिंधी, नलफडी, मूर्ती, विहीरगाव, सातरी, चनाखा, कोहपारा, पंचांळा, चुनाळा बामनवाळा, चिंचोली, अंतरगाव, अन्नूर, अमृतगुडा, खांबडा, सिर्शी अआदी गावांना वर्धा नदी पट्ट्यातील व डोंगरगाव सिंचन प्रकल्प पट्ट्यातील केळझर, नवेगाव, भेंडाळा, बेरडी चिंचबोडी, सोनुर्ली, सोंडो, चिचांळा, डोंगरगाव, कोष्टाळा, लकडकोट, घोट्ट्या, रेड्डीगुडा, सुब्बई, इंदिराणगर, थोमापूर, बापुनगर, मुंडीगेट आदी गावालगतच्या शेतातील खरीप पिकाला मोठा फटका बसला असून शेतजमिनीतील कापूस, धान, सोयाबीन व इतर पीक पाण्याखाली गेली आहे. आर्वी- तोहगाव मार्ग पूर्णत: बंद आहे व विरूरवरून तेलंगणाकडे सिरपूर-कागजनगरकडे जाणारा मार्ग चिंचोलीपासून पूर्णत: बंद आहे, विरूर-वरुर मार्ग अधूनमधून बंद पडत आहे. 

चंद्रपूर - अहेरी मार्ग बंद- वैनगंगा नदीला पूर आल्याने गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या आष्टी पुलावरून पाणी ओसंडून वाहत आहे. अनेक धरणांचे पाणी सोडल्याने गुरुवारी सकाळपासूनच चंद्रपूर-अहेरी मार्ग बंद आहे.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर