शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

चंद्रपूर जिल्हा सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 10:12 PM

जिल्ह्याच्या विविध भागात नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा सुरू होत्या. तालुकास्थळांच्या सीमेवरही त्या त्या भागातील पोलीस तैनात होते. तरीही काही नागरिक शहरातून फिरताना आढळले. सकाळी काही नागरिक नेहमीप्रमाणे बाहेर पडताना दिसले. विनाकारण बाहेर पडलेल्यांना पोलिसांच्या दंड्याचा सौम्य का होईना मार खावा लागला. या शिवाय जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडल्याचे ऐकिवात नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू होताच जिल्ह्याच्या सर्व बाजूच्या सीमा सील करण्यात आल्या. बाहेरून येणाऱ्यांना सीमेवरच अडविण्यात आले. जिल्ह्याच्या विविध भागात नागरिकांसाठी अत्यावश्यक सुविधा सुरू होत्या. तालुकास्थळांच्या सीमेवरही त्या त्या भागातील पोलीस तैनात होते. तरीही काही नागरिक शहरातून फिरताना आढळले. सकाळी काही नागरिक नेहमीप्रमाणे बाहेर पडताना दिसले. विनाकारण बाहेर पडलेल्यांना पोलिसांच्या दंड्याचा सौम्य का होईना मार खावा लागला. या शिवाय जिल्ह्यात कुठेही अनुचित घटना घडल्याचे ऐकिवात नाही.चंद्रपूर महानगरातील रस्त्यांवर सकाळी नागरिक काही प्रमाणात बाहेर पडले होते. मात्र प्रत्येक ठिकाणी पोलीस अडवत असल्यामुळे दुपारनंतर अपवाद वगळता कुणीही फिरकताना दिसले नाही. काहींना पोलिसांच्या लाठ्यांचा सामना करावा लागला. शहरात येणाऱ्या सर्व मार्गावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. किराणा दुकाने, पेट्रोल पंप सुरू होते. हीच स्थिती जिल्ह्यातील चंद्रपूरसह बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, पोंभूर्णा, सावली, मूल, सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी, चिमूर, वरोरा व भद्रावती या तालुक्यांची व तालुक्यातील गावांची होती. संचारबंदीमुळे नागरिक कुटुंबीयांसह घरातच राहणेच पसंत केले.मनपाद्वारे प्रतिबंधात्मक फवारणीराज्यात करोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेऊन भविष्यात उद्भवणारी आपात्कालीन सदृश्य परिस्थिती हाताळण्यासाठी महानगर पालिकेने शहरातील सर्व वार्डांमध्ये जंतूनाशक फवारणी सुरू करण्यात आली. बाजार, रेल्वेस्थानक, बसस्थानक, वर्दळीच्या ठिकाणी, पब्लिक कम्युनिटी टॉयलेट व रूग्णालयांमध्ये फवारणी धुरळणी केली जात आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग देशात झपाट्याने पसरत असल्याने नागरिकांनी आपली काळजी स्वत: घ्यायची आहे. या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तुंसाठी घराबाहेर पडा, परंतु गरज नसताना घराबाहेर निघू नये, असा सल्ला प्रशासनातर्फे देण्यात येत आहे.चंद्रपुरात ७५ दुचाकीस्वारांना दंडचंद्रपूर : संचारबंदीच्या काळात विनाकारण दुचाकीने शहरात फिरणाऱ्या ७५ दुचाकीस्वारांवर मंगळवारी रामनगर पोलिसांनी विविध कलमातंर्गत दंड ठोठावला. प्रशासनाच्या निर्देशांचे यापुढेही पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व रामनगरचे ठाणेदार हाके यांनी केले.माणिकगड कंपनी सुरूच - आमदाराची तक्रारकोरपना : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव रोखण्याकरिता जिल्हा प्रशासन परिश्रम घेत आहे. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही मंगळवारी माणिकगड सिमेंट कंपणीने कामगारांना कामावर बोलावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीत शेकडो कामगार कामावर आहेत. सर्व कंपन्या बंद करण्याचे आदेश असताना या कंपनीने कामगारांना कामावर बोलाविल्याने कंपनीवर कारवाई करण्याची मागणी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकºयांकडे केली आहे.