शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर ठरले जगात सर्वाधिक उष्ण शहर, महाराष्ट्राची पाच शहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 09:44 IST

पहिल्या १५ मध्ये अकाेला, वर्धा, मालेगाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उष्णतेच्या लाटेने राज्य होरपळून निघत असून, शुक्रवारी चंद्रपूरने तापमानात जगात  उच्चांक केला आहे. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, उस्मानाबाद  जिल्ह्यात उष्माघाताने एकाचा मृत्यू झाला आहे.  राज्यातील जळगाव, मालेगाव, अकोला, वर्धा या शहरांचे तापमानही  ४३ अंशाच्या वर नोंदले गेले. 

प्रत्यक्षात आज चंद्रपूरच्या तापमानात ०.४ अंशांची घट हाेऊन ४३.६ अंशांची नाेंद करण्यात आली, हे विशेष. गुरुवारी ते ४४ व त्यापूर्वी ४४.६ अंश हाेते. ३१ मार्चला कॅमरूनच्या गॅराैआ शहराचे तापमान ५४ अंश नाेंदविण्यात आले हाेते. याशिवाय माली देशाचे कायस आणि नारा व सेनेगलचे माटम शहर तापमानाच्या उच्चांकीवर आहे.  हवामानतज्ज्ञ प्रा. सुरेश चाेपणे यांच्या मते, सध्या पारा सरासरीएवढाच असला तरी त्याची तीव्रता अधिक जाणवत आहे. सध्या देशातील गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानसह विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात उष्ण लाटांचे सत्र सुरू आहे. ४ एप्रिलपर्यंत या प्रकाेपाचा सामना करावा लागणार आहे. त्यानंतर थाेडी घट हाेईल; पण ते स्थिर राहील. पुढे किमान दाेनदा तरी उष्ण लहरींचा सामना करावा लागणार आहे. 

महाराष्ट्राची पाच शहरेजगातील सर्वांत उष्ण शहरांच्या यादीत केवळ चंद्रपूर नाही, तर इतरही जिल्ह्यांचा समावेश आहे. ३१ मार्चला ४३ अंशापेक्षा अधिक पाऱ्यासह अकाेला आणि वर्धा पहिल्या १५ शहरांमध्ये हाेते. १ एप्रिलला ४३.१ अंश तापमानासह अकाेला जगात दहाव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ४३ अंशांसह अहमदनगर ११ व्या, ब्रह्मपुरी १२ व्या व मालेगाव १४ व्या क्रमांकावर आहे.

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरSun strokeउष्माघातMumbaiमुंबई