शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'ओबीसींवरील अन्यायासाठी केंद्र सरकारच जबाबदार'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2021 15:59 IST

न्यायालयाला हवा असलेला इम्पिरीकल डेटा हा केंद्र सरकारकडे आहे. तो केंद्र सरकार द्यायला तयार नाही त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होते आहे, असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले. 

चंद्रपूर :  ओबीसी आरक्षणासाठी आम्ही सतत लढा देत आहोत. केंद्र सरकारकडे ओबीसीचा इम्पिरीकल डेटा २०१६ पासून पडून आहे. केंद्राने त्यात दुरुस्ती न केल्याने ओबीसीवर आरक्षणाबाबत मोठा अन्याय झाला, असा आरोप राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंगळवारी चंद्रपुरातील जनता महाविद्यालयातील कृतज्ञता सोहळ्यात केला.

ओबीसी आरक्षणासाठी आज सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काम करणाऱ्यांना बाजूला करायला हवे. राज्य सरकार हे ओबीसी घटकाचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी प्रत्येक मार्ग तपासून पाहत आहे. राज्याची न्यायालयीन लढाई देखील सुरू आहे. मात्र, न्यायालयाला हवा असलेला इम्पिरीकल डेटा हा केंद्र सरकारकडे आहे. तो केंद्र सरकार द्यायला तयार नाही त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होते आहे, असे भुजबळ यावेळी म्हणाले. 

महाराष्ट्रमध्ये आरक्षण विरोधी कारवाया करण्यात कोण पुढे आहे, हे जनतेला चांगले ठाऊक आहे. २०१० पासून महात्मा फुले समता परिषदने आरक्षणासाठी लढा सूरू ठेवला. सर्वोच्च न्यायालयात याचिका टाकली. २०१६ पर्यंत हे आंदोलन सुरूच होते. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर ओबीसींचा डाटा त्यांच्याकडे गेला. अर्थतज्ज्ञ अरविंद पनगढीया यांच्या नेतृत्वात समिती नेमण्यात आली. परंतु, पाच वर्षे होऊनही अन्य सदस्यांची नियुक्तीच केली नाही. दरम्यान, पनगढीया यांनी राजीनामा दिल्याने हे काम थांबले. हा डाटा २०१६ पासून केंद्र सरकारच्या अखत्यारित आहे. मग त्यात दुरुस्ती का केली नाही, असा प्रश्न ना. भुजबळ यांनी उपस्थित केला.

२०१७ मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी होते. अध्यादेशातील चुका दुरुस्त करण्यासाठी व ओबीसी इंम्पिरीकल डेटा मिळविण्यासाठी २० पत्रे लिहिली. मात्र, केंद्र व तत्कालीन राज्य सरकारने हेतूपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे ओबीसी आरक्षणापासून वंचित आहे. एसटी व एसीप्रमाणे ओबीसीलाही घटनात्मक आरक्षण द्यावे, यासाठी आम्ही लढा देत राहणार आहे, असेही ना. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

जो ठसा उमटवेल त्यालाच तिकीट

जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका व नगरपंचायतच्या निवडणुकीत जे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचा ठसा उमटवतील त्यांनाच तिकीट देऊ. त्यासाठी पक्षातील सर्वांनी आगामी निवडणुकीसाठी कंबर कसून कामाला लागावे, असे आवाहन ना. भुजबळ यांनी कृतज्ञता सोहळ्यात केले.

टॅग्स :PoliticsराजकारणChhagan Bhujbalछगन भुजबळ