मूल : नागरिकांच्या आरोग्याबाबत शासन उदासिन आहे. केवळ उद्योजकांच्या इशाऱ्यावर शासन चालत आहे. शासनाचे आशा वर्करकडे दुर्लक्ष होत आहे. त्यांना अत्यल्प मोबदला दिला जातो, असा आरोप प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केला.आशा वर्कर संघटनेचा मेळावा छाया गोंगले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून वैशाली बोकारे,सायली बावणे उपस्थित होत्या.यावेळी बावणे म्हणाल्या, मातामृत्यू आणि बालमृत्यूमध्ये जगात भारताने आघाडी मारली होती. हा कलंक पुसून काढण्याकरिता राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचा प्रारंभ २००५ मध्ये संपूर्ण देशात राबविण्यात आला. मातेचे बाळंतपण दवाखान्यातच झाले पाहिजे, घरी होता कामा नये ही जबाबदारी आशा वर्करवर सोपविण्यात आली. माता ही बीपीएलची असेल तरच आशा वर्करला मोबदला दिल्या जातो मात्र ती एपीएलची असेल तर, मात्र मोबदला दिल्या जात नाही. जनतेच्या आरोग्याबाबत केंद्र शासन उदासिन असल्यामुळेच केंद्र शासनाने जनतेच्या आरोग्याशी खेळ चालविला असल्याच्या त्या म्हणाल्या. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी जी आश्वासने दिली त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आभार ममता भोयर यांनी मानले. मेळाव्यासाठी कविता मोहूर्ले, सुनीता डोंगरे, कल्याणी कोवे, राऊत, प्रधाने, बडगे, उडाण, गेडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)
नागरिकांच्या आरोग्याबाबत केंद्र शासन उदासीन
By admin | Updated: July 28, 2014 23:29 IST