शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

गणेशोत्सव व बकरी ईद शांततेत साजरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:52 IST

शहराचा सांस्कृतिक वारशामध्ये उत्सवाचा शांतताप्रिय इतिहास आहे. या इतिहासाला साजेशी अशी वर्तवणूक सर्वच समाजघटकांना एकमेकांकडून अपेक्षित आहे. त्यामुळे आगामी काळातील गणेश उत्सव व बकरी ईद या सणाच्या काळात शहरात उत्तम सौहार्दपूर्ण वातावरण ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : पोलीस मुख्यालय शांतता बैठक, गणेश मंडळाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहराचा सांस्कृतिक वारशामध्ये उत्सवाचा शांतताप्रिय इतिहास आहे. या इतिहासाला साजेशी अशी वर्तवणूक सर्वच समाजघटकांना एकमेकांकडून अपेक्षित आहे. त्यामुळे आगामी काळातील गणेश उत्सव व बकरी ईद या सणाच्या काळात शहरात उत्तम सौहार्दपूर्ण वातावरण ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.पोलीस मुख्यालयाच्या ड्रील शेडमध्ये सोमवारी दुपारी १२.०० वाजता गणेशोत्सव व बकरी ईद यासंदर्भात शांतता समितीची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला महापौर अंजली घोटेकर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, धर्मदाय आयुक्त व्ही. डी. शिंदे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे ठाणेदार, शांतता समितीचे सदस्य व समाजातील विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात गणेशोत्सव किंवा अन्य कोणत्याही उत्सवादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडत असल्याची नोंद नाही. या शहराच्या इतिहासामध्ये जातीय सलोख्याचे वातावरण कायम राहिले असून सर्व समाजाला याची विशेष जाण आहे. येणाऱ्या उत्सवकाळामध्ये देखील याच पद्धतीचे वातावरण शहरात ठेवण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा, तसेच व्हाट्स अ‍ॅप या सारख्या समाज माध्यमांवर येणाºया अफवापासून सावध रहावे, असे आवाहन केले.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी म्हणाले, गणेश उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था भंग करणाºया कुठल्याही घटकाला माफ केले जाणार नाही. कायद्याचा आदर करेपर्यंत जिल्हा पोलीस आपल्या सोबत असतील. मात्र आपण कायद्याचा अनादर केला तर आम्ही कायदेशीर कारवाईस मागेपुढे बघणार नाही. त्यामुळे कोणतीही तक्रार उद्भवणारच नाही याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच ज्या मुद्यांवर गणेश मंडळांना विविध परवानगी घ्याव्या लागतात त्यासाठी एकाच ठिकाणी व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. महापौर अंजली घोटेकर म्हणाल्या, शहरात गुण्यागोविंदाने सगळ्या समाजाचे सण-उत्सव शांततेत साजरा करण्याची चंद्रपूरकरांची परंपरा आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव व बकरी ईदच्या काळात पोलीस प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.बैठकीला शांतता समितीचे राजेंद्र सिंग गौतम, मोहम्मद इजाज मोहम्मद अजीज, डॉ. मंगेश गुलवाडे, सुरेश चोपणे, सदानंद खतरी, धनंजय दानव, शालिनी भगत, सय्यद रमजान अली, मोहम्मद खान, बाळू खोबरागडे, हाजी इकबाल साहाब, मुस्ताक रिजवी प्रत्येक गावातील गणेश उत्सव मंडळाचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. संचालन जिल्हा विशेष शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जे. आर चव्हाण यांनी केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीPoliceपोलिस